शिरपूर वरवाडे नगर परिषदेच्या घंटागाडी चालकाची डिझेल चोरी उघड दोघांविरोधात गुन्हा दाखल






शिरपूर-वरवडे नगर परिषदेच्या स्वच्छता विभागात घंटागाडी वर आठ दिवसांपूर्वी कंत्राटी चालक म्हणून नियुक्त करण्यात आलेल्या शहीद सलीम पटेल वय 28 राहणार ईदगाह नगर शिरपूर यास दिनांक 20 ऑक्टोबर रोजी डिझेल चोरून विकतांना माजी नगराध्यक्ष प्रभाकर चव्हाण यांनी रंगेहात पकडले . दोघाना विरुद्ध मंगळवारी शिरपूर शहर पोलीस ठाण्यात स्वच्छता निरीक्षक जितेंद्र अहिरे यांनी फिर्याद दाखल केली आणि गुन्हा दाखल करण्यात आला आहे .दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास आर सी पटेल संकुलातून निमझरी नाका कडे जाणारे माजी नगराध्यक्ष प्रभाकर चव्हाण व व तारीख शेख यांना श्यामाप्रसाद मुखर्जी उद्यानाजवळ संशयित शाहिद पटेल एका रिक्षात पाच लिटर डिझेलची ठेवताना आढळून आला संशय आल्याने नगराध्यक्ष चव्हाण यांनी स्वच्छता निरीक्षक आयरे यांना घटनास्थळी बोलून खात्री केली संसायिताने
डिझेल घंटागाडीत न टाकता चोरीच्या उद्देशाने कॅनमध्ये ठेवल्याचे आढळले उर्वरित पाच लिटर डीझेल सह त्याला शिरपूर पोलिसांकडे सोपवण्यात आले .याप्रकरणी स्वच्छता निरीक्षक यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार 750 रुपयांचे दहा लिटर डिझेल चोरून विकल्याच्या संशयावरून शाहिद पटेल व रिक्षा चालक अजहर यांच्याविरुद्ध शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने