*सध्याच्या परिस्थितीत शेतकऱ्यावर अस्मानी संकट उभे आहे हे सर्वत्र पाहावयास मिळत असताना राजकारण्यांनी शेतकऱ्यावर आलेल्या संकटाचा फायदा राजकारणासाठी करू नये*
* भिम आर्मी जिल्हा महासचिव लक्ष्मण कांबळे *
लातुर :- अवकाळी पावसामुळे राज्यातील अनेक शेतकऱ्याचे कधीही भरून न निघणारे नुकसान झाले आहे. हे सर्वजण आपण उघडया डोळ्यासमोर पाहत आहोत अनेक शेतकऱ्याच्या शेतात पिकाच्या वर पाणी उभा आहे .तर काही शेतकऱ्याच्या शेतातील मातीच वाहून गेलेली आहे तर काही शेतकऱ्याच्या शेतात पावसाचे पाणी थांबून तळ्याचे स्वरूप आले. अश्या बिकट परिस्थितीतुन शेतकरी राजा कसा वर यायचा हा प्रश्न शेतकरी राज्या समोर उभा आहे. महाराष्ट्र राज्यातील सर्वच राजकारणी अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी दौवरे करत आहे . राज्यात जिल्ह्यात कोणत्या ठिकाणी किती पाऊस पडला याची सरकार दरबारी नोंद असताना ही सरकार पंचनामे करण्याचे आदेश देऊ .असे म्हणत निघून जात आहे. सरकार माय बाप हो आता पाहणी दवरे थांबवून लवकरात लवकर शेतकऱ्यांना त्यांचा बँक खात्यात पन्नास हाजर रुपये मदत द्या शेतकऱ्याच्या नुकसानीत सरकाने व पुढार्यांनी राजकारण करूनये .या अस्मानी संकटातून शेतकरी राज्याला सरकाने झालेल्या नुकसानीची मदत देऊन या संकटातून सावरण्यासाठी मदतीचे बळ देण्यात यावे असे भिम आर्मीचे जिल्हा महासचिव लक्ष्मण कांबळे यांनी आमचे प्रतिनिधी शी बोलताना दिली आहे
Tags
news
