शिरपूर : केळी फळपीक विम्याचा शासन निर्णया प्रमाणे शेतकऱ्यांना लाभ मिळावा यासाठी शिरपूर तालुक्याचे आमदार काशीराम पावरा यांनी धुळे जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी यांना कळविले आहे.
केळी पिक विमा (आंबिया) बहार हवामान व धोका कालावधी प्रमाणे शेतकऱ्यांना अद्याप पर्यंत योग्य ती नुकसान भरपाई मिळालेली नाही.
शेतकऱ्यांच्या खात्यावर फक्त प्रति हेक्टरी ३३ हजार रुपये प्रमाणे रक्कम जमा झाली आहे. कमी तापमान, वेगाच्या वारा, जादा तापमान व गारपीट असे ट्रिगर आहे. जादा तापमान, वेगाचा वारा व गारपीट बाबत जिल्हा कृषी अधीक्षक यांनी लेखी दिले असून त्याप्रमाणे वैयक्तिक पंचनामे देखील झाले आहेत. तरी दि. ३१ जुलै अंतिम तारखेनंतर ४५ दिवसात संपूर्ण विमा हप्ता जमा व्हायला हवा होता. पुढील काळात विमा हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर शासन निर्णयाप्रमाणे १२ टक्के व्याजाने जमा व्हावी व शेतकर्यांना न्याय मिळवून देण्यास सहकार्य करावे असे पत्र शिरपूर तालुक्याचे आमदार काशीराम पवार यांनी धुळे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांना दि. २२ ऑक्टोबर रोजी दिले.
भारतीय जनता पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष के. डी. पाटील यांनी याबाबतचे निवेदन आमदार काशीराम पावरा यांना दिले होते.
Tags
news
