जिल्ह्यातील आरोग्य प्रश्नांबाबत आरोग्यमंत्री सकारात्मक जि.प.अध्यक्ष राहुल केंद्रे यांची माहिती नागलगाव,येरोळ,मंगरूळ येथे लवकरच प्राथमिक आरोग्य केंद्र



लातूर प्रतिनिधी---- राहुल शिवणे
  लातूर जिल्ह्यातील सार्वजनिक आरोग्यबाबतच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी आरोग्यमंत्री ना.राजेश टोपे सकारात्मक असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहुल केंद्रे यांनी दिली.
    लातूर जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्याच्या प्रश्नांबाबत जिल्हा परिषद अध्यक्ष राहुल केंद्रे यांनी राज्याचे आरोग्यमंत्री ना.राजेश टोपे यांची भेट घेऊन त्यांना  जिल्ह्यातील आरोग्य प्रश्नांबाबत अवगत केले.जिल्ह्यातील ज्या आरोग्य केंद्रांना ग्रामीण रुग्णालयाचा दर्जा मिळाला आहे त्या आरोग्य केंद्रांचे स्थलांतर अन्य उपकेंद्रांच्या ठिकाणी होणार असून यामुळे आता नागलगाव व  येरोळ येथे प्राथमिक आरोग्य केंद्र होणार आहे.याशिवाय 15 नवीन प्राथमिक आरोग्य केंद्र व  115 उपकेंद्र यांची मागणी लवकरच पूर्ण होणार असून  जिल्ह्यातील वैद्यकीय अधिकारी व कर्मचा-यांची रिक्त पदे भरण्याची मागणीही  राहुल केंद्रे यांनी ना.श्री.राजेश टोपे यांच्याकडे केली.जिल्ह्यात वैद्यकीय अधिका-यांची ८ पदे व कर्मचाऱ्यांची ३१४ पदे तात्काळ भरून आरोग्य सेवा बळकट करावी अशी मागणी यावेळी केंद्रे यांनी केली.जिल्ह्यातील नव्याने प्रस्तावित प्राथमिक आरोग्य केंद्राना मंजुरीचे आश्वासनही ना.टोपे यांनी दिले.जिल्ह्यातील मोठ्या अॕम्ब्युलन्सचा प्रश्नही मार्गी लागत असल्याचे राहुल केंद्रे यांनी सांगितले .लातूर जिल्ह्यातील आरोग्य केंद्रांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्याबाबत आरोग्यमंत्री ना.राजेश टोपे सकारात्मक असल्याने आगामी काळात जिल्ह्यातील आरोग्य सेवा दर्जेदार होईल असे जिल्हा परिषद अध्यक्ष राहुल केंद्रे यांनी सांगितले .


चौकट---

    सार्वजनिक आरोग्याबाबत जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहुल केंद्रे यांच्या पाठपुराव्याचे व तळमळीचे ना.राजेश टोपे यांनी भरभरून कौतुक केले.नागलगाव, औराद  व येरोळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी ना.टोपे यांनी आरोग्य विभागाचे सचिव डॉ .प्रदीपकुमार व्यास यांना तातडीचे निर्देश दिले.यावेळी  चेअरमन दगडू साळुंके,  बापूराव राठोड, भास्कर पाटील आदी उपस्थित होते. 


 नवीन प्रस्तावित प्राथमिक आरोग्य केंद्र हे लातूर तालुक्यातील एकुरगा, अहमदपूर तालुक्यातील खंडाळी- नांदुरा, चाकूर तालुक्यातील उजळंब आणि शेळगाव, जळकोट तालुक्यात मंगरूळ आणि घोनसी, निलंगा तालुक्यातील अंसरवाडा आणि शेडोळ,  देवणी तालुक्यात जवळगा आणी  दवन हिप्परगा, औसा तालुक्यात आलमला आणि ए.सारोळा, शिरूर अनंतपाळ तालुक्यामधील हिप्पळगाव येथे आणि उदगीर मधील कौळखेड येथे नवीन प्राथमिक आरोग्य केंद्र प्रस्तावित करण्यात आली असून लवकरच ते मंजूर होतील यासोबतच जिल्हाभरात  115 उपकेंद्रांसाठीची मागणी ही आरोग्य मंत्री मा. श्री राजेश  टोपे यांच्याकडे करण्यात आली असून

 जिल्ह्यातील प्रस्तावित आरोग्य उपकेंद्र पुढील प्रमाणे आहेत. 

 *निलंगा* तालुक्यातील औराद शहाजानी ताडमुगळी,  चिचोंडी शिवणी कोतल, गौर  चिलवंतवाडी कासार शिरशी, नेलवाड,  दापका भवानी, कलांडी,  हलसी तुगाव,  हाडगा, सरवडी,  हाडोळी,  नदीहत्तरगा,  हंगरगा.


 *देवणी* तालुक्यातील होणाळी,  देवणी बुद्रुक2,  हेळब,  टाकळी आचवला.


 *रेणापूर* तालुक्यात गरसोळी,  मोरवड थोटे गाव,  सारोळा, गोढळा गोविंद नगर,  रामवाडी, 


 *औसा* तालुक्यात बेलकुंड, हिप्परगा, येलोरी,  जायफळ चलबुर्गा,  यळवट शिरसाल , गोपाळ गोटेगाव, याकतपूर 

 *जळकोट* तालुक्यात जळकोट3,  मंगरूळ धामणगाव,  मर सांगवी केकतसिंदगी.


 *शिरूर आनंतपाळ* तालुक्यामध्ये कानेगाव,  दैटणा,  सय्यद अंकुलगा,  चामरगा  तुरुकवाडी.

 *उदगीर* तालुक्यातील निडेबन, येनकी, चिघळी, डिग्रस,हैबतपूर,मलकापूर,कुमठा,  संताळा, नावंदी,  टाकळी,  शिरोळ,  चोंडी,  हंगरगा,  सोमनाथपुर.

 *लातूर* तालुक्यातील बामणी, महाराणा प्रताप नगर, म्हाडा कॉलनी,  कासारगाव, कानडी बोरगाव रामेगाव,  भेंडेगाव, भोसा कासार जवळा, जवळा बुद्रुक,  भाटा,मुरुड 3,  साखरा मांजरी, आर्वी,  खाडगाव शामनगर.

 *अहमदपूर* तालुक्यामधील काळेगाव,  सांगवी सुनेगाव, दत्तवाडी सावरगाव,  मोघा  हिपळगाव, वैरागड सोनखेडा,  देवकरा परचंडा,   टाकळगाव,  उमरगा, बेलूर, चोबळी. 

*चाकूर* तालुक्यातील  चापोली 2,  बोरगाव,  भाटसांगवी,  अलगरवाडी, अंबुलगा,  कबनसांगवी,  जानवळ 2,वडवळ 2,  कवठाळी या ठिकाणी नवीन 115 उपकेंद्र प्रस्तावित असून
 ही मागणीही लवकरच पूर्ण होऊन जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा ही अतिशय सक्षम होईल असा विश्वासही जिल्हा परिषद अध्यक्ष राहुल केंद्रे यांनी यावेळी व्यक्त केला.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने