शिरपूर तालुक्यातील शेतकऱ्यांना शिरपूर, सोनगीर टोलवर टोल माफी साठी निवेदन




शिरपूर प्रतिनिधी - शिरपूर तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या माल वाहू वाहनांना शिरपूर आणि सोनगीर टोल नाक्यावर टोल माफी मिळावी म्हणून आज दिनांक 29 ऑक्टोबर रोजी आमदार काशीराम पावरा, कृषी उत्पन्न बाजार समिती, आणि धुळे जिल्हा करणी सेना यांच्या वतीने निवेदन देण्यात आले आहे.
शिरपूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी माजी मंत्री अमरिशभाई पटेल यांच्याकडे ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या वाहनाला टोल माफी मिळावी अशी मागणी केली होती त्यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्याचे आमदार दादासो काशीराम पावरा यांनी जनसंपर्क अधिकारी शिरपूर आणि सोनगिरी टोल नाका यांना पत्र दिले आहे .कृषी उत्पन्न बाजार समिती शिरपूर या कार्यालयाकडून देखील सभापती नरेंद्रसिंह सिसोदिया यांनी शेतकऱ्यांच्या या मागणीसाठी अधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे तसेच धुळे जिल्हा करणी सेना व किसान करणी सेना यांच्यावतीने देखील या मागणीसाठी निवेदन देण्यात आले आहे.
 सदरच्या निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की शिरपूर तालुक्यात मोठ्या प्रमाणावर शेतकरी ऊस लागवड करत असतात. यावर्षी नैसर्गिक संकटामुळे तालुक्यातील शेतकरी हा आर्थिक अडचणीत असून उत्पादनात देखील घट झाली आहे त्यामुळे तालुक्यातील शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. अशा परिस्थितीत तालुक्यातील उस हा बारामती अग्रो साखर कारखाना कन्नड ,द्वारकाधीश साखर कारखाना सटाणा, आणि विठेवाडी साखर कारखाना इत्यादी ठिकाणी जात आहे. मात्र या मालाची वाहतूक करत असताना शेतकऱ्यांना शिरपूर आणि सोनगिरी टोलवर टोल टॅक्स भरावा लागत असल्याने त्याचा आर्थिक भार शेतकऱ्यावर पडत आहे .म्हणून किमान तालुक्यातील शेतकऱ्यांच्या ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांना टोल माफी द्यावी अशी मागणी आणि विनंती करण्यात आली असून कंपनीने शेतकऱ्यांच्या हातात निर्णय घ्यावा अशी विनंती करण्यात आले आहे.
 सदरचे निवेदन  जनसंपर्क अधिकारी  शिरपूर सोनगिरी टोल नाका  यांना देण्यात आले आहे 
शेतकऱ्यांची सदरची मागणी पूर्ण व्हावी म्हणून भाईसो अमरीश भाई पटेल आणि आमदार काशिरामजी पावरा यांनी लक्ष दिले व मार्गदर्शन केले आणि कृषी उत्पन्न बाजार समिती व करणी सेना यांनी या मागणीला समर्थन दिले म्हणून तालुक्याच्या शेतकरी वर्गाकडून आभार व्यक्त करण्यात आले आहे

 सदरचे निवेदन देण्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती नरेंद्र सिंह सिसोदिया, एडवोकेट गोपाल राजपूत , करणी सेनेचे जिल्हाध्यक्ष शिवा दादा राजपूत ,तालुका अध्यक्ष महेंद्र सिंह राजपूत माजी सरपंच  नांथे,करणी सेनेचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष सोशल मीडिया महेंद्र सिंह राजपूत आणि शेतकऱ्यांचे प्रतिनिधी म्हणून माजी उपसरपंच नांथे, अरविंद राजपूत, राहुल राजपूत, जयपाल राजपूत ,भटेसिंग राजपूत, भालचंद्र राजपूत ,जितेंद्र राजपूत गुलाब ढोले विलास भोई, प्रवीण पाटील, भरत कोळी इत्यादी या वेळेस उपस्थित होते.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने