कळमसरे येथे "शिव पंथी व्यसनमुक्ती केंद्र सत्संग मंडळ" चे अनेक साधू संत, महाराज यांच्या उपस्थितीत शिव मंदिराचा भूमिपूजन सोहळा उत्साहात,



आमदार काशिराम पावरा यांनी केले भूमिपूजन


शिरपूर - तालुक्यातील कळमसरे येथे "शिव पंथी व्यसनमुक्ती केंद्र सत्संग मंडळ" चे अनेक साधू संत, महाराज यांच्या उपस्थितीत शिव मंदिराचा भूमिपूजन सोहळा उत्साहात,

आमदार काशिराम पावरा यांनी केले भूमिपूजन पंथाचे अनेक साधू संत, महाराज यांच्या उपस्थितीत शिव मंदिराचा भूमिपूजन सोहळा उत्साहात,
आमदार काशिराम पावरा यांनी केले भूमिपूजन 

अनेक साधू संत, महाराज यांच्या उपस्थितीत शिव मंदिराचा भूमिपूजन सोहळा उत्साहात संपन्न झाला असून शिरपूर तालुक्याचे आमदार काशिराम पावरा यांनी यावेळी भूमिपूजन केले.

कळमसरे येथे प. पू. गुरुवर्य नानाबाबाजी समाधी स्थळ (आय. टी. आय. कॉलेज समोर) येथे दि. १४ ऑक्टोबर बुधवार रोजी दुपारी १ वाजता "शिव पंथी व्यसनमुक्ती केंद्र सत्संग मंडळ" यांच्या वतीने प. पू. गुरुवर्य सरस्वतीस्वरुप सुरेखा माताजी, महात्यागी श्री हरिदास बाबाजी (साकेतपुरी चेतन हनुमान मंदिर सेंधवा), तपोनिधी श्री आनंद आखाडा कपिलधारा काशी विश्वनाथ महंत डिगंबर राजीवपुरी (काशीवाले बाबाजी) यांच्यासह शिरपूर तालुक्याचे आमदार काशिराम पावरा, नुर अली हाजीकमाल शा. बरेना (मंगरुळपिर डिग्रेस, पप्पू बाबाजी), दामोदर दासजी बाबाजी इंदूर यांच्या हस्ते करण्यात आले.

कार्यक्रमाला तालुक्याचे आमदार काशिराम पावरा यांनी मनोगत व्यक्त करुन सर्व साधू संत, भाविकांचे शिरपुरात स्वागत करुन या धार्मिक कार्याला सर्वांनी मिळून पुढे नेण्यात येईल असे सांगितले. तर सर्व भाविकांनी मोठ्या उत्साहाने या कार्याला सहकार्य करण्याचे आवाहन केले.

यावेळी शिरपूर मर्चंट बँकेचे चेअरमन प्रसन्न जैन, नगरसेवक हेमंत पाटील, नगरसेवक रोहित रंधे, नगरसेवक हर्षल गिरासे, भाजपा माजी जिल्हा सरचिटणीस अरुण धोबी, मानव एकता पार्टीचे अध्यक्ष सुभाषसिंह जमादार, सामाजिक कार्यकर्ते विनायक कोळी, शिवसेनेचे मुकेश शेवाळे, डॅनी चांदे, अनेक पदाधिकारी, नागरिक उपस्थित होते. 

तसेच "शिव पंथी व्यसनमुक्ती केंद्र सत्संग मंडळ" चे मान्यवर, पदमसिंग महाराज, गिना महाराज, शांतीलाल महाराज, उत्तम महाराज जामन्यापाडा, जिका महाराज जवखेडा, प्रकाश महाराज अर्थे, निरंजन महाराज अजंदे, बापू बाबाजी बामखेडा, हिरांतजी बाबाजी बामखेडा फाटा, नात्या महाराज आस्तूंबा, संतोष बेलदार, युवराज महाराज बोराडी, रोहिदास महाराज जातोडे, देवा महाराज सेंधवा, शादल बाबा आप्पाजी महाराज शिरपूर, आनंद महाराज, बाबा गोसावी, खान्देश, मध्य प्रदेश व अनेक ठिकाणाहून भाविक यांनी उपस्थित राहून विविध धार्मिक कार्यक्रमात सहभाग घेतला.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने