एच.आर.पटेल कन्या माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय शिरपूर येथे वाचन प्रेरणा दिनानिमित्त डिजिटल ग्रंथालयाचे उद्घाटन







शिरपूर - येथील एच. आर. पटेल कन्या माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात भारतरत्न डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम जयंती व वाचन प्रेरणा दिनानिमित्त सोशल डिस्टंसिंग राखत कार्यक्रम संपन्न झाला.

कार्यक्रम अध्यक्षस्थानी संस्थेचे सीईओ डॉ. उमेश शर्मा होते. विद्यालयाचे प्राचार्य आर.बी.पाटील, पर्यवेक्षक एन.ई.चौधरी याप्रसंगी उपस्थित होते. प्रारंभी डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण करण्यात आले.

डिजिटल ग्रंथालयाचे उद्घाटन सीईओ डाॅ.उमेश शर्मा यांच्या हस्ते करण्यात आले. विद्यालयातील ग्रंथपाल हर्षल पाटील यांनी कोरोना काळात विद्यार्थिनींना विविध पुस्तके उपलब्ध व्हावे यासाठी साकारलेल्या या ग्रंथालयात क्रमिक पुस्तके, कथा, कादंबऱ्या, आत्मचरित्रे, वर्तमानपत्रे, सामान्य ज्ञानवर्धक पुस्तके, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, शिक्षकांचे युट्युब व्हीडिओ यांचा समावेश असून मोबाईल व संगणकावर विद्यार्थीनींसाठी कोरोना पार्श्र्वभूमीवर हे ग्रंथालय खुले करण्यात आले.

याप्रसंगी झालेल्या ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धेतील  स्पर्धकांचे प्रातिनिधिक सादरीकरण स्मार्टबोर्डवर करण्यात आले. प्रास्ताविकाद्वारे प्राचार्य आर.बी.पाटील यांनी कार्यक्रमाचा उद्देश सांगून कोरोना काळात विद्यालयामार्फत होणारे ऑनलाईन अध्यापन व उपक्रम याविषयी माहिती दिली.

विद्यालयातील शिक्षक बी.एस.महाजन व श्रीमती बी.जे.पाटील यांनी मनोगत व्यक्त केले.

अध्यक्षीय मनोगताद्वारे सीईओ डाॅ.उमेश शर्मा यांनी डिजिटल ग्रंथालय उपक्रमाविषयी गौरवोद्गार काढले व वाचन संस्कृती जोपासण्याचे आवाहन केले.

वक्तृत्व स्पर्धेचे परीक्षण आर.एच.भलकार व श्रीमती एम.डी.पाकळे यांनी केले. सूत्रसंंचलन एन.बी.

पाटील यांनी केले. आभार पी.एस.पाटील यांनी मानले.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने