वरूळ येथील एच. आर. पटेल कन्या विद्यालयात भारतरत्न डॉ ए पी जे अब्दुल कलाम यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन





शिरपूर - तालुक्यातील वरूळ येथील एच. आर. पटेल कन्या माध्य. व उच्च माध्य. विद्यालयात भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंती  दिनानिमित्त त्यांच्या प्रतिमेस भावपूर्ण अभिवादन करण्यात आले.

विद्यालयाचे प्राचार्य पी.आर. साळुंखे यांनी  प्रतिमेचे पूजन करून  माल्यार्पण केले. हा दिवस वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा करण्याचे तसेच वाचन संस्कृती टिकून राहण्यासाठी विद्यार्थ्यांनी नियमित वाचनाची सवय अंगिकारावी हीच खरी भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांना आदरांजली ठरेल असे आवाहन ऑनलाइन झूम मिटिंग द्वारे केले.

यावेळी राष्ट्रीय सेवा योजना अधिकारी आर. आर. रघुवंशी यांनी प्रास्ताविक केले. तसेच आजचा दिवस हा जागतिक हात धुवा दिवस म्हणून साजरा केला जात आहे व कोरोना च्या पार्श्वभूमीवर हात धुण्याचे महत्व या विषयी विद्यालयातील क्रीडा शिक्षक मनोज पाटील यांनी हात धुण्याचे शास्त्रोक्त प्रात्यक्षिक करून दाखवले , याप्रसंगी स्काऊट शिक्षिका मंगला पाटकर, डी. ए. जाधव, एस. जे. पाटील, एस. के. पाटील, बी. जी. पिंजारी, एन. एस. ढिवरे, ए. बी. महाजन, डी. एन. माळी, बी. एस. बडगुजर, बापू पारधी, पारस जैन आदींनी पुष्पांजली अर्पण करून भावपूर्ण विनम्र अभिवादन केले.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने