सात्रळ /प्रतिनिधी
राहुरी तालुक्यात कापूस खरेदी प्रतवारी चा बोर्ड लावावा तसेच सरकारी भावा नुसार कापूस खरेदी करावी.व वजन काटे प्रमाणित करावे.शेतकरी वर्गाला दिलासा देण्याची मागणी निवेदनाद्वारे देण्यात आली.
परिसरातील कापुस खरेदी दुकानदार शेतकऱ्यांना कोणतेही पक्के बिल देत नाहीत.
या उद्देशाने परिसरात शेतकरी वर्गावर कुठल्याही अन्यायाला बळी पडू नये यासाठी मा.तहसीलदार ,वजन काटा निरिक्षक राहुरी,राहुरी तालुक्या खरेदी विक्री संघ राहुरी, कृषी उत्पन्न बाजार समिती राहुरी, यांना निवेदन देण्यात आले.
शिवसेना जिल्हा प्रमुख रावसाहेब (नाना) खेवरे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच शिवसेना उपतालुका प्रमुख व नाभिक महामंडळचे जिल्हा कार्याध्यक्ष जयेश सुरेशचंद्र वाघचौरे,शिवसेना प्रवरा पंचक्रोशी प्रमुख सूरज जोर्वेकर,शिवसेना राहुरी तालुका प्रवक्ता अक्षय शिंदे, यांनी मा.तहसीलदार,मा.अरुण तनपुरे मार्केट कमिटी राहुरी,मा.सहायक निबंधक, राहुरी,सुधाकर तनपुरे,खरेदी विक्री संघ यांना निवेदनद्वारे मागणी करण्यात आली.
यावेळी प्रगतशील शेतकरी सोमनाथ डुक्रे,डॉ अमोल नागरे, भाऊसाहेब डुक्रे,प्रगतशिल लक्ष्मण गोरे, सुधीर नागरे,अॅड.प्रवीण चोखर,किशोर डुक्रे,सचदेव नागरे, अशोक डुक्रे आदि शेतकरी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
Tags
news
