शिरपुर : (प्रतिनिधी) जयपालसिंह गिरासे
राज्याचे महसुल राज्यमंत्री ना. अब्दुल नबी सत्तार यांचा आज दिनांक ११ राेजी शिरपुर तालुक्यात शासकीय दाैरा पार पडला. यावेळी ना. सत्तार यांनी दि.२० सप्टेंबर २० राेजी झालेल्या अवकाळी पाऊस, वादळ मुळे पिंप्री ता. शिरपुर येथे झालेल्या केळी, पपई, कापुस व ईतर फळपिकांच्या नुकसानीची प्रत्यक्ष शेताच्या बांधावर जावुन प्रशासकीय यंत्रणेसह पाहणी केली.
यावेळी ना. सत्तार यांनी तहसीलदार आबा महाजन यांना नुकसानीचे त्वरित पंचनामे करण्याचे आदेश दिले. तर पंधरा दिवसाच्या आत शासनाला अहवाल सादर करावा अशी सुचना केली. तर याप्रसंगी ना. सत्तार यांनी शेतकऱ्यांना सांगितले की, हे शेतकरी बांधवांचे शासन असुन राज्याचे मुख्यमंत्री मा. उध्दव ठाकरे यांच्या माध्यमातून तात्काळ नुकसान भरपाई मिळवुन देण्यासाठी प्रयत्नशील आहे. तर गेल्या वर्षी देखील व यंदा देखील शेतकरी बांधवांचे माेठे नुकसान झाले. दाेन्ही वर्षाची नुकसानीची रक्कम शासन स्तरावर पाठपुरावा करत दाेन टप्यात मिळवुन देईल. तर साेबत विम्याची रक्कम देखील मिळवुन देईल असे आश्वासन दिले.
यावेळी पाेलिस अधिक्षक चिन्मय पंडीत, प्रांत अधिकारी विक्रमसिंह बांदल, तहसीलदार आबा महाजन, कृषी अधिकारी अनिल निकम, थाळनेर सहाय्यक पाेलिस निरिक्षक सचिन सांळुखे तर शिवसेना सहसंपर्क प्रमुख अतुल साेनवणे, जिल्हा प्रमुख हेमंत सांळुखे, उपजिल्हा प्रमुख भरतसिंह राजपूत, तालुका प्रमुख अत्तारसिंग पावरा, तालुका प्रमुख दिपक चाेरमले, तालुका संघटक याेगेश सुर्यवंशी व पदाधिकारी उपस्थित हाेते. तर पिंप्री ता. शिरपुर येथील शेतकऱ्यांनी नुकसानीची भरपाई मिळावी यासाठी शेतात निवेदन दिले यावेळी
महेंद्रसिगं गिरासे, जयसिंग राजपूत, रोहीत गिरासे, जयपाल गिरासे, मनोज राजपूत, भुरातात्या गिरासे,
राकेश गिरासे, दिनेश गिरासे, विजय खैरनार, दिनेश गिरासे, गजेंद्र महाजन, भुषण गिरासे, रितेश राजपूत
नरेंद्र कोळी, पंडितसिंग राजपूत तसेच पिंप्री येथील शेतकरी बांधव उपस्थित हाेते.
Tags
news
