शहादा ( प्रतिनिधी ) - सातपुडा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन व शहादा परिसराचे नेते दीपक पाटील यांच्या वाहनाचे टायर फुटल्याने दुपारी एक वाजेच्या सुमारास मनरद रस्त्यावरील हॉटेल राजरंग समोर अपघात झाला. पाटील यांची प्रकृती सुखरूप असून , त्यांच्या हाताला किरकोळ दुखापत झाली असल्याची माहिती त्यांचे बंधू भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष प्राचार्य मकरंद पाटील यांनी दिली . त्यांना त्वरित रुक्मिणी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. आता ते विद्याविहार येथील निवासस्थानी सुखरुप पोहोचले आहेत. पण कृपया कार्यकर्त्यांनी घरी भेटावयास येऊ नये व निवासस्थानी गर्दी करू नये .तुम्हा सर्वांच्या आशीर्वादाने तब्येत उत्तम असल्याचे कळविण्यात आले आहे .
Tags
news
