बोरखेडा हत्याकांडाचा खटला जलदगती न्यायालयात चालवण्यात येईल - गृहमंत्री अनिल देशमुख



 

          जळगावदि.17 - बोरखेडाता. रावेर येथील हत्याकांड माणूसकीला काळीमा फासणारे असून याची निंदा करतो. या हत्याकांडातील दोषींवर कठोर कारवाई करण्यासाठी व पिडीतांना शीघ्र न्याय मिळण्यासाठी हा खटला जलदगती न्यायालयात चालविण्यात येईल. यासाठी अ‍ॅड.उज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून नेमणूक करण्यात येईलअशी माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज दिली.

          बोरखेडाता.रावेर येथे चार बालकांची निघ्रृण हत्या झाली त्या ठिकाणास गृहमंत्री श्री.देशमुख यांनी आज दुपारी भेट देऊन घटनास्थळाची पाहणी केली तसेच पिडीत कुटुंबाची भेट घेवून त्यांचे सांत्वन केले.   

          यावेळी त्यांच्यासमवेत जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सौ.रंजनाताई पाटीलखासदार श्रीमती रक्षाताई खडसेआमदार शिरीष चौधरीआमदार अनिल पाटीलमाजी मंत्री सर्वश्री एकनाथ खडसेगुलाबराव देवकरनाशिक विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक प्रताप दिघावकरजिल्हाधिकारी अभिजीत राऊतपोलीस अधिक्षक डॉ.प्रविण मुंडेप्रांताधिकारी कैलास कडलगउपविभागीय पोलीस अधिकारी नरेंद्र पिंगळेतहसिलदार उषाराणी देउगुणेअ‍ॅड.रविंद्र पाटीलअभिषेक पाटीलप्रतिभा शिंदे आदी उपस्थित होते. 

          यावेळी गृहमंत्री श्री.देशमुख म्हणाले कीया हत्याकांडाचा पोलीस योग्य दिशेने तपास करीत असून त्यांना सकारात्मक पुरावे मिळाले आहे काही संशियतांना ताब्यातही घेण्यात आले आहे. दोषींवर कठोर कारवाई करण्यासाठी आवश्यक तो तपास लवकरात लवकर पूर्ण करण्याचे निर्देशही यावेळी दिले. त्याचबरोबर शासन नियमानुसार पिडीतांना योग्य ती मदत देण्यात येईल तसेच त्यांना रेशनकार्डजातीचा दाखलाघरकुल व शेती करण्यासाठी जमीन उपलब्ध करुन देण्याची सूचनाही त्यांनी जिल्हाधिका-यांना दिली.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने