कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असताना....



स्वर्गीय तपनभाई पटेल यांच्या भगिनी सौ. मेहाजी पटेल व द्वैताजी पटेल यांनी मा.भुपेशभाई पटेल यांच्यासोबत आदिवासी भगिनीच्या समस्या जाणून घेण्यास व सोडविण्यास आंबे परिसरातील आदिवासी पाड्यांवर तसेच द्वैता पटेल नगर येथे आज भेट दिली.

स्वर्गीय तपनभाई मुकेशभाई पटेल चॅरेटिबल ट्रस्ट यांच्या तर्फे द्वैता पटेल नगर येथे उत्तम दर्जाचे  ब्लॅंकेट वाटप करण्यात आले.

स्वर्गीय खासदार आदरणीय मुकेशभाई पटेल यांची कन्या सौ. मेहाजी पटेल आणि मा.श्री.भुपेशभाई पटेल यांची कन्या द्वैताजी पटेल यांनी द्वैता नगर व आंबे परिसरातील घरोघरी जाऊन आदिवासी महिला बघिणीची भेट घेऊन आरोग्याविषयी माहिती जाणून घेतली आणि लोकांना उद्भवत असलेल्या समस्या जाणून घेतल्या.

स्वर्गीय तपनभाई यांनी विकासकामे करून द्वैता पटेल नगरचे कायापालट कश्याप्रकारे केले आहे यांची तेथील लोकांनी पावती दिली. मेहाजी  भावाच्या आठवणीने भारावल्या. 

द्वैता पटेल नगर येथिल पाण्याच्या स्टोरेजची समस्या सोडविण्यासाठी सौ.मेहाजी यांनी गोर गरीब आदीवासी लोकांच्या सुखसोयीसाठी पाण्याची टाकी बसविण्याचा तात्काळ निर्णय घेऊन स्व.तपनभाई पटेल यांचे अपूर्ण असलेल्या स्वप्नाची पूर्तता करण्यात  *स्वर्गीय तपनभाई मुकेशभाई पटेल चॅरेटिबल ट्रस्टच्या* माध्यमातून एक पाऊल टाकले आहे.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने