शिरपूर - चालत्या स्कुटीचा अचानक स्फोट झाल्याने 22 वर्षीय चालक युवकाचा मृत्यू झाल्याची घटना



तळोदा तालुक्यातील चिनोदे येथील युवक सागर सुरेश मराठे वय २२ हा आपल्या मामाच्या गावातील मयत नातेवाईकांच्या गंधमुक्ती कार्यक्रमासाठी शिरपूर तालुक्यातील कुवे येथे आपल्या स्कुटीने आला होता दि 15 रोजी सकाळी साडे दहा ते साडे अकरा दरम्यान कुवे येथील अमरधाम जवळ रस्त्यावर स्कुटीवरून तो जात असतांना चालत्या स्कुटीचा अचानक स्फोट झाला या स्फोटात सागर मराठे गंभीररित्या भाजल्या गेल्याने जखमी झाला.स्कुटी संपूर्ण जळून खाक झाली.

सागर मराठे याला जखमी अवस्थेत नातेवाईकांनी तात्काळ शिरपूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले.पुढील उपचारासाठी धुळे येथे हलविण्यात आले. उपचारादरम्यान मात्र सागर मराठेचा मृत्यू झा.स्कुच्या स्फोटाचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. मात्र या घटने बद्दल परिसरात हळहल व्यक्त होत आहे.




Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने