शिरपूर (प्रतिनिधी)पीओएस मशीन लाईव्ह न करणे तसेच अन्न सुरक्षा अंतर्गत वाटप सुरु न करणे या कारणास्त्व शिरपूर तालुक्यातील एकुण २१ रास्तभाव दुकानदारांना तहसिलदार आबा महाजन यांनी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.
दि.१९ ऑक्टोंबरपर्यंत खुलासा सादर करण्याचेदेखील बजावण्यात आलेले आहे. त्यानंतर संबंधीतांवर कारवाई करण्यात येईल असेही निर्देश देण्यात आलेले आहेत. मिळणारा धान्यसाठा दुकानात येवूनही ग्राहकांच्या तक्रारी वारंवार येत असल्याने संबंधित दुकानदारांनी आपल्या चुका दुरुस्त न केल्यास कायदेशीर कारवाई करण्याचे सकेत तहसीलदार आबा महाजन यांनी दिले.
Tags
news
