शिरपूर - छावा मराठा युवा महासंघाचे संस्थापक अध्यक्ष शिवश्री मा. धनाजी येळकर पाटील यांनी छावा मराठा युवा महासंघाच्या धुळे महिला जिल्हा अध्यक्ष पदी शिरपूर तालुक्यातील संघर्षशील समाजसेविका डॉ. सरोजताई पाटील यांची नियुक्ती केली . महासंघाचे जळगावचे जिल्हाध्यक्ष अमोल कोल्हे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देऊन हि नियुक्ती करण्यात आली . सदर नियुक्ती बद्दल छावा मराठा युवा महासंघाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपालिताई राक्षे , शिवराम पाटील आदींनी डॉ सरोज यांचे अभिनंदन केले आहे . डॉ. सरोजताई ह्या धुळे जिल्हा जागृत जनमंच चे संजोजक संस्थापक आहेत त्यांनी या मंच द्वारे जनसामान्य नागरिकांना न्याय दिलेला आहे.. सर्व स्थरातून या मनःपूर्वक अभिनंदन होत आहे.
Tags
news
