शेतकऱ्यांना सरसकट मदत दया प्रहार ची मुख्यमंत्री यांना मागणी





प्रतीनिधी राहुल शिवणे
अतिवृष्टीमुळे लातूर जिल्ह्यातील उदगीर तालुक्यात झालेल्या परतीच्या अवकाळी पावसामुळे उदगीर तालुकासह आजुबाजूच्या परिसरातील शेतकऱ्यांनी मागच्या काही दिवसात सोयाबीनची काढणी केली होती आणि रास करणे शिल्लक होते.पंरतु गेल्या आठ दिवसात उदगीर परिसरात झालेल्या अतीवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतला आहे तसेच तुरी व अन्य पिकांचे देखील आतोनात नुकसान झाले आहे तरी संबंधित शेतकऱ्यांना शासनांमार्फत सरसकट भरपाई देण्यात यावी  असे निवेदन प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने मा.उपजिल्हाधिकारी साहेब उदगीर यांच्या मार्फत मा .मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे साहेब महाराष्ट्र राज्य यांना निवेदन देण्यात आले.यावेळी प्रहार अध्यक्ष विनोद तेलंगे, कार्याध्यक्ष रवि बेलकुदे,उपाध्यक्ष महादेव मोती पवळे,संदीप पवार, संघटक सुर्यभान चिखले, सरचिटणीस अविनाश शिंदे चिटणीस निळंकठ मुदोळकर, शहर कार्याध्यक्ष गणेश दावणे चंद्रकांत येंजगे सर व इतर प्रहार सेवकांनी निवेदन दिले आहे..

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने