नगरसेवकाच्या ऑईलमीलवर धाडसी चोरी, वाॅचमनची मिलीभगत. .... सीसीटीव्ही फुटेजमुळे, वाॅचमनसह तीन आरोपी पोलिसांच्या ताब्यात. ..




*दोंडाईचा -* येथील स्वीकृत नगरसेवक श्री गिरीधारीलाल नानकमराम रूपचंदाणी यांच्या शहादा रस्त्यावरील सिंधी कॉलनी समोरील मुकेश ऑईल मील व कैलास ट्रेडर्समध्ये रविवारी पहाटे  अज्ञात चोरटय़ांनी एक लाख पस्तीस हजार रूपयांच्या तांदुळाच्या कट्ट्याची   चोरी केली आहे . 

याबाबत दोंडाईचा पोलीस स्टेशनला श्री गिरीधारीलाल नानकमराम रूपचंदाणी यांनी दिलेली फिर्याद अशी की,   दिनांक चार ऑक्टोबर रोजी सकाळी सात वाजता  वाॅचमन उत्तम मारोती थोरात, राहणार डाॅलडा घरकुल हा घरी आला व त्याने सांगितले की, रात्री अडीच वाजेनंतर सह ते सात अज्ञात व्यक्तींनी मला जीवेठार  मारण्याची धमकी देत, गेट उघडायला सांगत, गोडावुनमध्ये जबरदस्तीने  घुसून चाॅकलेट चिनार, लष्करी कालम, चिनोर कंपनीचे शंभराच्या वरती पन्नास किलो वजनाच्या तांदुळाच्या कट्टे वाहून नेले. तसेच  माझ्या जवळ मोबाईल नसल्यामुळे मी संपर्क करू शकलो नाही असे सांगितले.   त्यावेळी मी तसाच मीलवर धावत गेलो असता प्रथमतः सीसीटीव्ही कॅमेरे चेक केले. तेव्हा मला माझ्याकडे असलेल्या वाॅचमनवर शंका आली. कारण तो रात्री बर्‍याच वेळ त्याच्याशी गप्पा मारत होता. म्हणून मी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे रितसर तक्रार देत आहे , असे आपल्या तक्रारीत त्यांनी म्हटले आहे. 

याबाबत दोंडाईचा पोलिसांनी काही वेळातच आरोपीला खाक्या दाखवताच,वाॅचमन उत्तम मारोती थोरात याने सातपैकी  दोन जणांची ओळख दाखवली. त्यात शिवाजी संपत वळवी राहणार संत कबीर नगर व दुसरा लालू तिरथराम शर्मा आदी दोघांना पोलिसांनी पकडून आणून पुढील तपासासाठी ताब्यात घेतले आहे.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने