शिरपूर - सेंधवा कडून धुळ्याकडे एक आयशर वाहनामधून कत्तलीच्या उद्देशाने अवैधरित्या गुरांची वाहतुक होत असल्याची गोपीनय बातमीवरून शिरपूर शहर पोलिसांनी दि १ ऑक्टोबर रोजी सायंकाळी राष्ट्रीय महामार्गावर टोल नाक्यावर कार्यवाही करीत १४ बैलांसह १ लाख ८० हजाराच्या मुद्देमाल ताब्यात घेत दोन जणांना अटक करण्यात केली.
पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांना मिळालेल्या गोपीनय माहितीवरून मुंबई आग्रा महामार्गावर टोल नाक्यावर दि.१ रोजी सायंकाळी शिरपूर शहर पोलिसांनी सापळा रचला होता.सायंकाळी ७:३० वाजेच्या सुमारास संशयित आयशर क्रं आर जे १९ जीडी ५९३१ थांबवून चालकाकडे चौकशी केली असता भाजीपाल्याचे खाली कॅरेट भरले असल्याचे सांगितले परन्तु वाहनाची तपासणी केली असता सदर गाडीत अत्यंत निर्दयीपणे आखूड दोराने दाटावतीने १४ गोवंश (बैल) आढळून आले.कत्तलीच्या उद्देशाने जनावरांची वाहतूक करीत असल्याचा संशय आल्याने ८० हजार रुपये किमतीचे १४ गोवंश व १० लाख किमतीची आयशर गाडी सह दोन संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
याप्रकरणी पोकॉ हेमंत पाटील यांनी शिरपूर शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यावरून गाडी तौशिक मुक्तीयार शेख वय ३१ रा सुकीडा ता जि धार, व अमजद खान लिकायत वय २९ रा केसुर ता जि धार यांच्या विरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक चंद्रकांत पाटील करीत आहेत
वरील कार्यवाही शिरपुर शहर पोलीस स्टेशनचे पोलिस निरिक्षक हेमंत पाटील,यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि सी.बी. पाटील,पोकॉ हेमंत पाटील पोकॉ महेंद्र सपकाळ आदींनी केली.
Tags
news

