दागिने चोरीच्या गुन्ह्यात आरोपीला शिताफीने पकडण्यात सांगवी पोलिसांना यश




शिरपूर प्रतिनिधी -  शिरपूर तालुक्यातील तालुका पोलीस स्टेशन सांगवी येथे फिर्यादी शिकाऱ्या आणाज्या पावरा राहणार न्यू बोराडी यांच्या फिर्यादीवरून गुन्हा रजिस्टर नंबर 90 /2020 भादवि कलम 380 प्रमाणे दागिने चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदरच्या गुन्ह्यांमध्ये फिर्यादी यांनी हकीकत नमूद केले होते की दिनांक 17 सप्टेंबर रोजी त्यांच्या घरातील लोखंडी कपाटाचे लोकर ची चावी हरवल्यामुळे त्यांनी एका अनोळखी व्यक्तीला चॉबी बनवण्यासाठी घरी बोलावले होते. सदरच्या लॉकरमध्ये वडीलच वडिलोपार्जित आणि काही दिवसांपूर्वी खरेदी केलेले एकूण 1 किलो 500 ग्रॅम वजनाचे चांदीचे पांढऱ्या धातूचे दागिने ठेवले होते. मात्र ज्या व्यक्तीचे  चॉबी तयार करण्यास बोलावले होते त्याने चलाखी करून तक्रारदार यांची पत्नी चहा करण्यास गेले असता माझा भाऊ बाहेर आला आहे त्याला पाहून घ्या असे सांगून तक्रारदार यात जरा बाहेर पाठवले यानंतर मी पुरेसे साहित्य आणलेले नाही त्यामुळे मी उद्या या कपाटाची चावी तयार करून देईन असे सांगून लॉकरच्या होल मध्ये कापसाचा बोळा अडकून दिला.मात्र दुसर्‍या दिवशी  चॉबी बनवणार आला नाही म्हणून दिनांक 1ऑक्टोबर 2020 रोजी लोकर च्या दरवाजा उघडून पाहिला असता त्यामध्ये दागिने आढळून आले नाहीत यावरून दागिन्यांची चोरी झाल्याची खात्री पटली.
दिनांक 1/10/2020 रोजी फिर्यादी यांनी त्यांचे चोरीस गेलेल्या चांदीच्या दागिन्यांपैकी 1 कीलो 100 ग्राम रु.49,500 चे दागिन्यांचा हिशोब हा खरेदी पावती निशी दिला होता. तसेच उर्वरित वडिलोपार्जित दागिन्याबाबत वजनाची निश्चीत माहिती फिर्यादिस नसल्याने अंदाजे 25,000/- रुपये किमतीचे दागिन्यांचे प्रथम खरबरीत स्वतंत्र नोंद केली होती. 

वरील माहितीच्या अनुषंगाने सांगवी पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील यांनी आपले एक पथक तयार करून तपास सुरू केला असता विविध ठिकाणावरील सीसीटीवी फुटेज व परिसरातील किरकोळ विक्रेते अन्य साक्षीदार तसेच मध्य प्रदेश पोलिसांच्या मदतीने सदर चाली बनवणाऱ्या इसमाची ओळख पटवण्यात यश आले सदर चाली बनवणारी व्यक्ती हि प्रवीण सिंग जीवन सिंग खबीर वय 17 राहणार उमरटी तालुका वरला जिल्हा बडवानी मध्य प्रदेश असल्याचे निष्पन्न झाले या व्यक्तीच्या ताब्यातून 1,10,000 रुपये किमतीच्या चोरीच्या मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे
आरोपी कडून दागिने हस्तगत केले वेळी एकूण दागिन्यांचे वजन करता 1 किलो 490 ग्राम वजन मिळून आले त्यानुसार बाजार भाव प्रमाणे हस्तगत मालाचे मूल्य प्रेस नोट मध्ये एकूण रु. 1,10,000/- असे नमूद केले आहे.
सदस्य कारवाई मा. पोलीस अधीक्षक चिन्मय पंडित, अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव ,उपविभागीय पोलिस अधिकारी अनिल माने यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील पोलीस कॉन्स्टेबल संजय देवरे, हेमंत फुलपगारे, संजीव जाधव ,भूषण चौधरी यांच्या पथकाने केली आहे



Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने