शिरपूर : संपुर्ण धुळे जिल्ह्यत मोठ्या प्रमाणात मका या पिकाचे उत्पादन घेण्यात येते सध्या मका हमीभाव खरेदी केंद्र सुरु नसल्याने जिल्ह्यातील धुळे, शिरपूर, शिंदखेडा, साक्री या चारही तालुक्यातील मका उत्पादक शेतकरी नाराज आहेत. त्यामुळे जिल्ह्यात तातडीने मका हमीभाव खरेदी केंद्र सुरु करण्यात यावे अशी मागणी भाजपा महाराष्ट्र प्रदेश सदस्य बबनराव चौधरी यांनी (दि.५ आॅक्टो) रोजी जिल्हाधिकारी संजय यादव धुळे यांची भेट घेवून केली आहे. यावर्षी पाऊस वेळेवर व चांगला असल्याने खरीपाची पेरणी, लागवड म्रुग नक्षत्रात असल्याने पिके चांगली होती. परंतु सप्टेंबर महिन्यात सतत मुसळधार, वादळी वाऱ्यासह पाऊस झाल्याने मोठ्या प्रमाणात खरीप पिकांचे मूग, उडीद यांचे या अगोदरच तसेच बाजरी, ज्वारी, कापूस, कांदा, भुईमुग, भाजीपाला आदींचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने शेतकऱ्यांचा हातचा हंगाम वाया जाणार असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. आधीच कोरोनाच्या लॉकडाऊन काळात शेतकरी आर्थिक अडचणीत सापडलेला आहे असे नमुद केले आहे. भाजपा महाराष्ट्र प्रदेश सदस्य बबनराव चौधरी यांनी निवेदनाची प्रत राज्याचे मुख्यमंत्री ना. उद्धव ठाकरे, महा. विधान सभा विरोधीपक्ष नेते ना. देवेंद्र फडणवीस, कृषीमंत्री ना. दादाजी भुसे, पालकमंत्री ना. अब्दुल सत्तार, जिल्हा मार्केटिंग अधिकारी धुळे यांना हि पाठविल्या आहेत. भाजपा महाराष्ट्र प्रदेश सदस्य बबनराव चौधरी यांनी निवेदनात म्हटले आहे कि जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात मक्याचे पीक घेतले जाते सध्या मका खरेदी केंद्र व नोंदणी केंद्र सुरु नसल्याने शेतकरींचा मका व्यापारी कमी (मातीमोल) भावाने घेत असल्याने शेतकरींची आर्थिक पिळवणुक होत आहे. तरी तातडीने जिल्ह्यात जास्तीत जास्त मका खरेदी व नोंदणी केंद्र सुरु करुन एकाच ठिकाणी होणारी गर्दी कमी करण्यात यावी अशी मागणी हि भाजपा महाराष्ट्र प्रदेश सदस्य बबनराव चौधरी यांनी जिल्हाधिकारी संजय यादव धुळे यांच्याकडे केली आहे.
Tags
news
