■ प्रकाशा येथे शहीद भगतसिंग सार्वजनिक वाचनालयाचे उद्घाटन ◆◆ युवकमित्र परिवारातर्फे १०० पुस्तके भेट




शहादा (प्रतिनिधी) :- वाचन प्रेरणा दिनानिमित्त व भारतीय युवकांचे प्रेरणास्थान, मिसाईल मॅन, भारताचे माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ.ए.पी.जे अब्दुल कलाम यांच्या जयंतीचे औचित्य साधुन आज दिनांक १५ ऑक्टोबर  रोजी शहीद भगतसिंग सेवा दल, महाराष्ट्र राज्य तर्फे शहीद भगतसिंग सार्वजनिक वाचनालयाचे प्रकाशा (ता.शहादा)  येथे उद्घाटन करण्यात आले.
              वाचनालयाच्या उद्घाटना प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून विजय चौधरी (भाजपा जिल्हा अध्यक्ष), कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य मकरंद पाटील (भाजपा जिल्हा उपाध्यक्ष), रामचंद्र पाटील (माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष), निलेश माळी (जिल्हा सरचिटणीस), नितीन कोळी (भाजपा कामगार आघाडी शहादा तालुका अध्यक्ष), विनोद ठाकरे (आदिवासी मोर्चा नंदुरबार जिल्हा चिटणीस), सुदाम ठाकरे (सरपंच), अरुण भाई (जिल्हा परिषद सदस्य), रंग्या भाऊ भिल (पंचायत समिती सदस्य), पंडित भोई (भाजपा मच्छीमार सेल अध्यक्ष), महेंद्र शेठ, मनोज सोनार, दिलीप पाटील, किशोर पाटील, मुकेश पाटील, प्रशांत पाटील तसेच पत्रकार बांधव कार्यक्रमाला उपस्थित होते.
            युवकमित्र परिवारातर्फे 'गाव तेथे वाचनालय' उपक्रमांतर्गत वाचनालयासाठी १०० पुस्तके भेट देण्यात आली. तसेच प्रकाशा गावातील पोलिस भरतीची तयारी करणाऱ्या १० युवकांना हॉटेल तापी परिसर चे मालक सुरेंद्र राजपुत आणि दिनेश वरसाळे यांच्याकडून स्पोर्ट जर्सी चे वाटप करून प्रोत्साहित करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमोल देशपांडे यांनी केले व आभार अक्षय भावसार यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अक्षय भावसार, अविनाश शिरसाठ, पंकज कोळी, सागर पाटील, विशाल सोनार, किरण सदगीर, राजु साळी, अमोल देशपांडे, ऋषिकेश शिम्पी, निखिल चौधरी, महेंद्र साळी, कपिल वसावे, ग्रामस्थ तसेच ज्ञात-अज्ञात व्यक्तींनी परिश्रम घेतले.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने