शहादा (प्रतिनिधी) :- दामळदा (ता. शहादा) येथे व्यायाम शाळेचे साहित्य वाटप व परिसरातील विकास कामांचे भूमिपूजन शहादा तळोदा मतदार संघाचे आमदार राजेश पाडवी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आमदार पाडवी यांनी ग्रामस्थांच्या व परिसराच्या विविध समस्या जाणून घेतल्या त्यात दामळदा ते खेतीया रस्ता, गावातील रस्ता काँक्रेटिकरण, असलोद ते दामळदा, सावखेडा ते जावदा रस्ता, लोहारा ते दामळदा रस्ता दुरुस्ती करणे, दामळदा येथे सामाजिक सभागृह उभारणी करणे, स्मशानभूमी बांधणे, गोमाई नदीवरील सरंक्षण भिंत अश्या विविध समस्या त्यावेळी ग्रामस्थांनी मांडल्यात.
त्यावेळी आमदार पाडवी म्हणले की, माझी या दामळदा गावात पहिली सभा आहे. व मी दामळदा गावातील विविध समस्या जाणून घेतल्या त्यात शेतकऱ्यांना वीज पुरवठा पाहिजे, पाणी पाहिजे, व शेतशिवार रस्ता पाहिजेत. व तरुणांना व्यायाम शाळा पाहिजे मी जेवढ्याही भागात जातो त्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या या रस्त्यांच्या समस्या व तरुणांना व्यायाम शाळेच्या समस्या जास्त आहेत, मी शेतकऱ्यांना माझ्या शहादा तालुक्यातील घरी दहा १०० चे ट्रान्सफार्मर (रोहित्र) व तळोदा येथील घरी दहा १०० चे ट्रान्सफार्मर (रोहित्र) ठेवणार आहे. कारण ट्रान्सफार्मर जाळले की शेतकऱ्यांना आठ-आठ दिवस मिळत नाही पण मी तसे होऊ देणार नाही आज ट्रान्सफार्मर जळाले की दुसऱ्या दिवशी माझ्या घरून ट्रान्सफार्मर घेऊन जाणे. तरुण वर्गाने व्यायाम शाळेचा उपयोग करणे जेणेकरून भरती प्रक्रियेत अडचण नको, तरुणांना भरती प्रक्रियेत काहीही मदत लागल्यास मला कळवणे मी आपली नक्की मदत करेल.
त्यावेळी माध्यमिक विद्यालय दामळदा च्या वतीने आमदार पाडवी, तालुका अध्यक्ष शशिकांत पाटील व गटविकास अधिकारी सी. टी. गोसावी यांचा सत्कार करण्यात आला त्याच सोबत गावातील तरुणांनी देखील आमदार पाडवी यांचा सत्कार केला. त्यावेळी आमदार पाडवी, भाजपचे तालुका अध्यक्ष शशिकांत पाटील, माजी जि. प.सद्स्य सुनील चव्हाण, पंचायत समिती गटविकास अधिकारी सी. टी. गोस्वामी, जि. प. सदस्य वंदनाताई प्यारेलाल पटले, पंचायत समिती सदस्य विद्या विजय चौधरी, पंचायत समिती सदस्य सुषमा शरद साळुंके, पंचायत समिती सदस्य गणेश पाटील, गोविंद पटले, विरसिंग पाडवी, अभियंता हरीश भोई, दामळदा संरपच हरेराम मालचे, दामळदा उपसंरपच डॉ विजय चौधरी, विठ्ठलराव बागले, आदिवासी मोर्चा जिल्हा सचिव नारायण दादा ठाकरे, गुड्डू वळवी, ओबीसी मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष योगेश पाटील, जगदेव सर, भोरटेक सरपंच जयसिंग पवार, भोरटेक उपसरपंच सुनिल पवार, दिलवर राजपूत, ठानसिंग चव्हाण, डॉ. ऋषिकेश पाटील, मुख्याध्यापिका मनीषा पाटील, योगेश पाटील, शरद साळुंके, ग्रामस्थ मंडळी व परिसरातील नागरिक आदी उपस्थित होते.
Tags
news
