अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदे तर्फे निमगूळ येथील 2 वर्षीय बलिकेच्या हत्यारांना फाशी देण्याची मागणी.




धुळे तालुक्यातील निमगुळ येथे परवा रात्रीच्या वेळेला काही नराधमांनि एका 2 वर्षांच्या निष्पाप, निरागस, चिमुकली कु. प्राची माळी या बालिकेचे अपहरण करून तिची अमानवीय पद्धतीने हत्या करून  तिचा मृतदेह विहीरीत फेकून दिला. यामुळे संपुर्ण परिसरात एकच भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेची चौकशी करून, अश्या नराधमांना, समाजकंटकाना त्वरित पकडून त्यांना फाशीची शिक्षा देण्यात यावी व तिच्या कुटुंबियांना न्याय मिळावा असे निवेदन मा. तहसीलदार शिंदखेडा यांना आज अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने देण्यात आले. तसेच माळी परिवारास न्याय न मिळाल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल असे निवेदनाद्वारे म्हटले आहे. निवेदन देते वेळी श्री.सुनील चौधरी(नगरसेवक), श्री.दीपक अहिरे(नगरसेवक), चंद्रकांत सोनवणे(नगरसेवक) योगेश बागुल(युवक जिल्हाध्यक्ष), दिनेश बापू माळी(जिल्हा संघटक), चंद्रकांत बैसने(युवक जिल्हा संघटक), अनिल माळी (युवक तालुका अध्यक्ष), भैय्या माळी(तालुका अध्यक्ष), गणेश खलाने(शहर अध्यक्ष), प्रांजल सोनार (शहर उपाध्यक्ष), कैलास वाघ(शहर संघटक), योगेश खलाने, मुकेश माळी, वासुदेव माळी, कुणाल जाधव, शाम ठाकरे व अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद, शिंदखेडा तालुका व शहर पदाधिकारी उपस्थित होते.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने