नाशिक जिल्हा प्रतिनिधी शांताराम दुनबळे यांजकडून .
नाशिक-:आज दिनांक 26/10/2020 सोमवार रोजीं रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षाचे वतीने नाशिक विभागाचे महसूल उपायुक्त श्री दिलीप स्वामी साहेब यांची महाराष्ट्र रत्न अनिलभाई गांगुर्डे यांच्या नेतृत्वाखाली भेट घेऊन वरील विषायाचे निवेदन दिले..
निवेदनात म्हटले आहे की सध्या उत्तर महाराष्ट्र तसेच महाराष्ट्रात अतिवृष्टीमुळे अनेक शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले असून सरकारने केलेली मदत अत्यंत तोकडी असून शेतकऱ्यांना एकरी 25 हजार रुपये अनुदान द्यावे त्याचप्रमाणे ज्या शेतकऱ्यांचे पावसात घरे पडली त्यांना नवीन घरे बांधून द्या त्यांच्या मुलांचे शिक्षण मोफत करा त्याचप्रमाणे नाशिक रोड ते नांदूर नाका मार्ग जेलरोड येथील आवजड वाहतूक बंद करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली..
याप्रसंगी आरपीआय (आठवले) पक्षाचे उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख तथा महाराष्ट्र रत्न अनिलभाई गांगुर्डे,उत्तर महाराष्ट्र प्रवक्ते प्रमोदजी बागुल,उत्तर महाराष्ट्र नेत्या तथा महिला आघाडी नाशिक जिल्हाध्यक्ष सौ.गुफाताई भदरगे,युवा नेते नितीन भाऊ ठोके, युवा नेते प्रशांतभाऊ गांगुर्डे आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
Tags
news
