आगर टाकळी येथे हॉटेल नानाज् चे उद्घाटन सोहळा संपन्न.



बेरोजगारीचे वाढते प्रमाण लक्षात घेता तरुणांनो उद्योजक बना-महाराष्ट्र रत्न अनिलभाई गांगुर्डे.
नाशिक जिल्हा प्रतिनिधी शांताराम दुनबळे यांजकडून 
 नाशिक-: नाशिक आगर  टाकळी येथे  धम्मचक्र परिवर्तन दिनाचे औचित्य साधून हॉटेल नानाज् च्या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी उद्घाटक तथा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षाचे उत्तर महाराष्ट्र संपर्कप्रमुख तथा महाराष्ट्र रत्न अनिलभाई गांगुर्डे यांनी संबोधित करताना उद्योजक क्षेत्रात तरुणांनी येऊन उद्योजक बनावे असे प्रतिपादन तरुणांना केले.
दरम्यान ह्या हॉटेलच्या उद्‍घाटन सोहळ्या प्रारंभी तथागत भगवान गौतम बुद्ध,विश्वभुषण भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पुजन करून धम्मवंदना घेण्यात आली.
याप्रसंगी मा.गोकुळ नाना पगारे,सौ.विमल गोकुळ पगारे,मा.महाराष्ट्र रत्न अनिलभाई गांगुर्डे, मा.यशवंतभाई साळवे,यांच्या हस्ते फित कापून उद्घाटन करण्यात आले.

याप्रसंगी अन्याय अत्याचार कृती समितीचे मुख्य निमंत्रक मा.राहुलभाऊ तुपलोंढे माजी नगरसेवक मा.रमेशजी जाधव,मा.प्रकाशजी पगारे,मा.रमेशजी साळवे,मा.सुमितभाऊ उन्हवणे,मा.सुभाषजी साळवे,पत्रकार सागरभाऊ केदारे,जयेशभाई सोनवणे,सागर(आण्णा)शिरसाठ आकाश नानु साळवे  दैनिक महाभारत नाशिक जिल्हा प्रतिनिधी शांताराम दुनबळे आदी विविध सामाजिक क्षेत्रातील मान्यवर, मित्र परिवार नातेवाईक उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन युवा नेते विक्रांत गांगुर्डे यांनी केले.
आभार हॉटेलचे मालक मा.संजयजी पगारे,मा.भास्करजी पगारे,मा.प्रकाशजी पगारे, युवा नेते प्रमोदजी पगारे सर,संकेतजी पगारे,अनिकेत(शेरा) पगारे,सिध्दार्थ(रिंकु)पगारे, प्रतिक पगारे, आर्यन पगारे यांनी विशेष परीश्रम घेतले

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने