स्व. तपनभाई पटेल यांच्या स्वप्नपूर्तीसाठी पाच शैक्षणिक संकुलांचे भूमिपूजन संपन्न




शिरपूर : स्व. तपनभाई पटेल यांच्या स्वप्नपूर्तीसाठी पाच शैक्षणिक संकुलांच्या भूमिपूजन कार्यक्रम विजयादशमीच्या शुभ मुहूर्तावर दि. २५ ऑक्टोबर रविवार रोजी संपन्न झाला.

माजी मंत्री अमरिशभाई पटेल, पटेल परिवाराने राज्यभर समाजकारणात, राजकारणात सर्व क्षेत्रात विकास करण्यासाठी सातत्याने बहुमोल योगदान देण्याचा प्रयत्न केला आहे. शिक्षणानं माणूस समृद्ध होतो, संपन्न होतो. विचारांच्या कक्षा रुंदावतात. त्यासाठी येणाऱ्या पिढ्यांना दर्जेदार, कौशल्यपूर्ण, फलदायी आणि शिस्तबद्ध शिक्षण देण्यासाठी पटेल परिवार सातत्याने प्रयत्नशील आहे. 
स्व. रसिकलाल पटेल (पप्पाजी) आणि स्व. मुकेशभाई पटेल (माजी खासदार) यांच्या प्रेरणेतून आणि स्व. तपनभाई मुकेशभाई पटेल यांच्या संकल्पनेतून पटेल परिवाराच्या वतीने यापूर्वी केल्या प्रमाणे विविध भव्यदिव्य शैक्षणिक संकुले सुरु केली जात आहेत. या ज्ञान संकुलांच्या इमारतींचा भूमिपूजनाचा कार्यक्रम विजयादशमीच्या शुभ मुहूर्तावर दि. २५ ऑक्टोबर रविवार रोजी करण्यात आला.

श्री विलेपार्ले केळवणी मंडळ चे अध्यक्ष तथा माजी मंत्री अमरिशभाई पटेल, सह-अध्यक्ष भूपेशभाई पटेल, उपाध्यक्ष चिंतनभाई पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम संपन्न झाले.

श्री विलेपार्ले केळवाणी मंडळ मुंबई संचलित सेंटर ऑफ टेक्सटाईल फंक्शन्स (तांडे, ता. शिरपूर) च्या इमारतीचे भूमिपूजन प्रभाकरराव चव्हाण (सचिव : आर. सी. पटेल शैक्षणिक संकुल) यांच्या हस्ते सकाळी ८.३० वाजता करण्यात आले. त्यानंतर श्री विलेपार्ले केळवाणी मंडळ मुंबई संचलित (स्कूल ऑफ ॲग्रीकल्चर सायन्सेस अँड टेक्नॉलॉजी च्या इमारतीचे भूमिपूजन तरडी-बभळाज येथे आमदार काशिराम पावरा यांच्या हस्ते सकाळी ९.३० वाजता करण्यात आले. त्यानंतर शिरपूर एज्युकेशन सोसायटी संचलित आर.सी.पटेल आश्रम शाळा इमारतीचे भूमिपूजन गरताड येथे डॉ. तुषार रंधे (अध्यक्ष, जिल्हा परिषद, धुळे) यांच्या हस्ते सकाळी ११ वाजता झाले. श्री विलेपार्ले केळवाणी मंडळ मुंबई संचलित फार्मसी महाविद्यालय इमारतीचे भूमिपूजन सावळदे येथे डॉ. विक्रमसिंह बांदल (उपविभागीय अधिकारी, शिरपूर) यांनी सकाळी ११.१५ वाजता केले. त्यानंतर शिरपूर एज्युकेशन सोसायटी संचलित आर.सी. पटेल माध्यमिक विद्यालय इमारती चे भूमिपूजन सावळदे येथे तहसीलदार आबा महाजन यांच्या हस्ते झाले.


तरडी बभळाज येथे स्कूल ऑफ ऍग्रीकल्चर सायन्सेस अँड टेक्नॉलॉजीच्या इमारतीचे भूमिपूजन आमदार काशिराम पावरा यांनी केले. यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष डॉ. तुषार रंधे, आर. सी. पटेल शैक्षणिक संकुलाचे उपाध्यक्ष राजगोपाल भंडारी, आर. सी. पटेल शैक्षणिक संकुलाचे सचिव प्रभाकरराव चव्हाण, ऍग्रीकल्चर कॉलेज इनचार्ज डॉ. गौरीशंकर राव
सत्तरसिंग पावरा, बबनराव चौधरी, के. डी. पाटील, नरेंद्रसिंग सिसोदिया, देवेंद्र पाटील, प्रकाश गुजर, लक्ष्मण पाटील, जगन्नाथ महाजन, संजय पाटील, बी. एच. पवार, अनिल गुजर पाटील, गयभू पाटील, शिवाजी पाटील, ज्ञानेश्वर पाटील, योगराज पाटील, काशिनाथ राऊळ, माधवराव पाटील, दिलीप पटेल, भरत पाटील, जगतसिंग राजपूत, संतोष परदेशी, राजेंद्र पाटील, वसंतराव पाटील, योगेश बोरसे, अशोक कलाल, भटू माळी, अरुण धोबी, संजय आसापुरे, प्रल्हाद पाटील, लक्ष्मीकांत पाटील, बालू चव्हाण, भैय्या चव्हाण, श्यामकांत ईशी, वासुदेव देवरे, नारायणसिंग चौधरी, रज्जाक कुरेशी, सलीम खाटीक, भुरा राजपूत, राजेंद्र पाटील, जयवंत पाडवी, राजू एजंट, नरेंद्र पाटील, संतोष माळी, प्राचार्य दिनेशकुमार राणा, निश्चल नायर, पी. सुभाष नायर, तरडी, बभळाज, हिसाळे, तोंदे, मांजरोद, अहिल्यापूर, होळनांथे, पंचक्रोशीतील विविध संस्थांचे पदाधिकारी, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी आमदार काशिराम पावरा यांच्या हस्ते व असंख्य पदाधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत विधिवत पूजा करण्यात आली.
शिरपूर शहर व तालुक्यात आर. सी. पटेल शैक्षणिक संकुल तसेच मुंबई येथील श्री विले पार्ले केळवणी मंडळ यांच्या मार्फत मोठ्या प्रमाणात गुणवत्तापूर्ण व दर्जेदार 
शिक्षणाच्या सुविधा उपलब्ध करण्यात आल्याने विद्यार्थी, पालक, नागरिक हे समाधान व्यक्त करीत आहेत.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने