शिरपुर भाजपा तर्फे सरदार वल्लभभाई पटेल व महर्षी वाल्मिकी जयंती निमित्त अभिवादन


शिरपूर - राष्ट्रीय एकता दिना निमित्त भारताचे  एकात्मकतेने देशाला बांधून ठेवणारे *लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल* यांचा जयंती निमित्त तसेच रामायण महाकाव्याचे रचनाकार *आद्यकवी महर्षी वाल्मिकी* यांच्या जयंती निमित्त शिरपूर भाजपा तर्फे आजरांजली वाहण्यात आली प्रथम येथील सरदार वल्लभभाई पटेल यांचा पुतळ्यास *आ. काशिराम दादा पावरा, भाजपा प्रदेश सदस्य तथा नासिक विभागीय म्हाडा माजी उपसभापती बबनराव चौधरी* यांचा हस्ते फुलमाला अर्पण करुन अभिवादन करण्यात आले नंतर भाजपा कार्यालयात सरदार वल्लभभाई पटेल व महर्षी वाल्मिकी यांचा प्रतिमेस दोघे मान्यवरांचा हस्ते फुलहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी शिरपूर भाजपा तालुकाध्यक्ष किशोर माळी, शहराध्यक्ष हेमंत पाटील, धुळे भाजपा मा. जिल्हा सरचिटणीस अरुण धोबी, ज्येष्ठ नेते एन. डी. पाटील, मा. जिल्हा चिटणीस संजय आसापुरे, तालुका उपाध्यक्ष विजय पाटील, ता. चिटणीस सुनिल चौधरी, महेंद्र पाटील, प्रशांत चौधरी, मुकेश पाटील, सुभाष राजपुत, मुबीन शेख, देवेंद्र देशमुख, अविनाश शिंपी, राधेश्याम भोई, सतीश गुजर, रविंद्र भोई, भालेराव माळी, रफीक तेली, राजुलाल मारवाडी, हिरालाल कोळी, राहुल गुजर, विनायक कोळी, सुभाष कोळी, निंबा धनगर, हंसराज चौधरी, सुनिल पाटील, प्रणव भराने, अनिल बोरसे, गणेश माळी आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने