"धुळे: -महाराष्ट्रातील सुमारे अडीच लाख मजी सैनिक व त्यांच्या विधवांचा मालमत्ता कर माफ करण्याच्या निर्णयावर , गुरुवार दि.29-10-2020 रोजी संपन्न झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकित मुख्यमंत्री ना ऊद्धव ठाकरे यांनी शिक्कामोर्तब केल्याची माहिती धुळे जिल्हा माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष महेशबाबा घुगे यांनी दिली. राज्यातील माजी सैनिक व त्यांच्या विधवांचा ग्रामिण व शहरी भागातील मालमत्ता कर माफ करण्याची मागणी , गेल्या कित्येक वर्षापासून धुळे जिल्हा माजी सैनिक संघटना व राज्यातील ईतर संघटना करित होत्या. त्यासाठी विविध प्रकारची न्यायोचित आंदोलनेही छेडली गेली होती. राज्य सैनिक कल्याण मंडळाचे तत्कालीन संचालक कर्नल जतकर यांनीही महाराष्ट्र शासनाकडे त्यासाठी पाठपुरावा केला होता. या सर्वाची दखल घेऊन, विद्यमान सैनिक कल्याण मंत्री ना. दादा भुसे यांनी त्या अर्थाचा सकारात्मक अहवाल कांही महिण्यापूर्वी, मंत्रीमंडळाला सादर केला होता. राज्याचे विद्यमान वित्तमंत्री ना. अजितदादा पवार यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात ना. दादा भुसे यांनी सादर केलेल्या प्रस्तावाला हिरवा कंदील दाखविला होता. त्यानंतर अजितदादा पवार यांनीच या संदर्भात ला सकारात्मक निर्णय 13 मार्च 2020 रोजी , विधान सभेत जाहिर.केला होता. दि 29 - 10 -2020 रैजी संपन्न झालेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकित , मुख्यमंत्री ना. ऊद्धव ठाकरे यांनी , मंत्रीमंडळाने घेतलेलया निर्णयावर शिक्कामोर्तब केले. महाराष्ट्र शासनाने घेतलेल्या या निर्णयानुसार आता, आर्थिक द्रुष्ट्या सक्षम असलेल्या ग्राम पंचात, नगर पंचायत, नगर पालीका, आणि महानगर पालीका यांनी स्व ईच्छेने करमाफीचा भार स्विकारायचा आहे, सक्षम नसलेल्या स्था. स्व. संस्थांचा आर्थिक भार महाराष्ट्र शासनाचा ग्रामविकास विभाग व नगर विकास विभाग सोसणार आहे. अशी महिती महेश घुगे यांनी दिली असून शासनाचे आभार मानले आहेत.
Tags
news
