*शिंदखेडा (प्रतिनिधी)* : गाव तेथे शाखा, घर तेथे शिवसैनिक या मोहिमेअंतर्गत तालुक्यातील भडणे गावात शिवसेना सदस्य नोंदणी अभियानाची सुरुवात शिवसेनेचे धुळे ग्रामीणचे जिल्हाप्रमुख हेमंत साळुंके यांच्या हस्ते करण्यात आली. याप्रसंगी शेकडो नवीन शिवसैनिकांनी प्राथमिक सदस्य म्हणून नोंदणी केली.
यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करतांना श्री. साळुंके म्हणाले की, राज्याचे मुख्यमंत्री तथा पक्षप्रमुख श्री.उध्दवसाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार गाव तेथे शाखा, घर तेथे शिवसैनिक मोहिम राबवून शिवसैनिकांनी एकजुटीने पक्षाच्या कामाला लागावे. शिवसेना पक्षवाढीसाठी प्रयत्न करावेत. येणाऱ्या काळात शिंदखेडा तालुक्यातील ग्रामपंचायतीपासून सहकार क्षेत्रापर्यंतच्या सर्व निवडणुकांमध्ये यश संपादन करण्यासाठी कामाला लागावे. मुख्यमंत्री तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री हे आपल्याच पक्षाचे असल्यामुळे शेतकऱ्यांच्या तालुक्यातील किंवा जिल्ह्यातील ज्या काही समस्या आहेत त्या सोडविण्याचा प्रयत्न केला जाईल. कोरोनाचा प्रभाव आता हळूहळू कमी होत आहे. परिस्थिती प्रतिकूल जरी असली तरी आता आपण पूर्वपदावर येत आहोत. कोरोनाच्या या काळात विकासकामे खूप मोठ्या प्रमाणात रखडली आहेत. ती कामे मार्गी लावायची आहेत. तसेच वाडी-शेवाडी प्रकल्पातील डाव्या आणि उजव्या कालव्याची क्षमता वाढवून शेतकऱ्यांना पाणी कसे देता येईल, हा प्रयत्न चालू आहे. शिंदखेडा तालुक्यातील विकासाचा अनुशेष मोठा आहे. भविष्यात पक्षाच्या माध्यमातून ठोस काम करण्यासाठी व पक्ष संघटन मजबूत, मोठा होणेसाठी सभासद नोंदणी अभियान प्रभावी राबवावे. पक्ष वाढला तर आपण वाढू. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री श्री. उध्दव ठाकरे साहेब ज्या पध्दतीने काम करताय त्यांचा आदर्श आपण सगळ्यांनी घेतला पाहिजे, असेही श्री.साळुंके म्हणाले. यावेळी शिवसेनेचे माजी जिल्हा परिषद सदस्य कै. वामनराव पाटील यांच्या आठवणींना उजाळा देवून त्यांना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. यावेळी श्री. मंगेश पवार, शानाभाऊ सोनवणे, सर्जेराव पाटील, छोटू पाटील, यांनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी जिल्हाप्रमुख हेमंत साळुंके यांच्या समवेत जिल्हा संघटक मंगेश पवार, उपजिल्हाप्रमुख शानाभाऊ सोनवणे, विधानसभा संघटक छोटू पाटील, उपजिल्हा संघटक भाईदास पाटील, दोंडाईचा कृ.उ.बा.स.चे संचालक सर्जेराव पाटील, तालुकाप्रमुख गिरीश देसले, तालुका समन्वयक विनायक पवार, उपतालुकाप्रमुख शानाभाऊ धनगर, शैलेश सोनार, दोंडाईचा शहर प्रमुख चेतन राजपुत, शिंदखेडा शहर प्रमुख सागर देसले, पं.स.सदस्य ईश्वर पाटील, माजी. पं.स.सदस्य दिपक पाटील, युवासेना उपजिल्हाप्रमुख गणेश परदेशी, उपतालुकाप्रमुख मनोज पवार, माजी शहरप्रमुख नंदकिशोर पाटील, माजी सरपंच संजय देसले, माजी सरपंच दत्तु माळी, उपसरपंच अशोक बागुल, भिकन पाटील, पोपट माळी, सुदाम देसले, सुकदेव बागुल यांच्यासह असंख्य ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. सुत्रसंचालन सतिष माळी यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी भडणेचे लोकनियुक्त सरपंच व शिंदखेडा तालुका प्रमुख श्री. गिरीश देसले यांनी परिश्रम घेतले.
Tags
news
