पेठ तालुक्यात विविध भागात कोजागिरी पौर्णिमा उत्साहात साजरी .



                             नाशिक जिल्हा प्रतिनिधी शांताराम दुनबळे यांजकडून .                                नाशिक-:पेठ तालुक्यात कोजागिरीच्या उत्साहीं सध्याकाळ पासून धार्मिक कार्यक्रमाला उधान आले होते.हरीपाठ,किर्तन,भजन या मंगलमय दिनी रात्र जणू या कार्यक्रमात नववधू सारखी सजली होती.दुधाचे आंधन चुलीवर ठेउन त्यात चंद्राचा शितल प्रकाश अंतभ्रुत होत होता .भजनी मंडळी अंभगात तल्लीन होउन भजन म्हणत होती.मुले आम्हाला दुध मिळेल या आशेवर जागीच होती.कारण या दिवशी चंद्र अम्रूताचा वर्षाव करतो आणि दुधात तो शिंपन करतो अशी धारणा आजही समाजात दृढ झालेली दृष्टीस पडते.या कार्यक्रमात पंचक्रोशीतील  अनेक भाविक सामील झालेले होते.पैकी  ,कोहोर,घनशेत,शिंदे,आङगाव ,भायगाव,घोटविहरा,आडगाव,विरकशेत,खिरकडे,उस्थळे ,पेठ,इत्यादी ठीकाणी कोजागिरी पौर्णिमा उत्साहात साजरी करण्यात आली. अशी माहीती श्रीह.भ.प.पंढरीनाथ वालवणे गुरुजी वारकरी मंडळ पेठ तालुका अध्यक्ष यांनी दिली आहे

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने