‘वनहक्क’ दाव्याप्रकरणी आता आयुक्तांकडे करता येणार अपील

 



 

धुळे, दि. 1 (जिमाका वृत्तसेवा) : अनुसूचित जमाती इतर पारंपरिक वननिवासी (वन हक्कांची मान्यता) अधिनियम सुधारणा नियमानुसार अंमलबजावणी अंतर्गत जिल्हास्तरीय वनहक्क समितीने अमान्य केलेल्या वनहक्क दाव्यांच्या निर्णयाविरुध्द दाद मागण्यासाठी आता विभागीय आयुक्त, नाशिक यांच्या अध्यक्षतेखाली विभागीय अपिलीय समिती स्थापन करण्यात आली आहे. मा. राज्यपाल यांच्याकडील 18 मे 2020 रोजीच्या अधिसूचनेतील कलम 6-A नुसार ही समिती गठित करण्यात आली आहे. अनुसूचित क्षेत्रातील (फक्त पेसा क्षेत्रातील) ज्या वनहक्क धारकाचा वनहक्क दावा जिल्हास्तरीय वनहक्क समितीने फेटाळला, अमान्य केला, असेल तर या निर्णयाविरुध्द आता अशा वनहक्क दावेदारांना अपील करता येणार आहे. जिल्हा समितीच्या निर्णयाविरुध्द अपर आयुक्त, आदिवासी विकास विभाग, महाराष्ट्र राज्य, आदिवासी भवन, गडकरी चौक, नाशिक येथे अपील दाखल करावेत, असे जिल्हाधिकारी संजय यादव यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकान्वये कळविले आहे.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने