सर्व नागरिकांना
सार्वजनिक, कामाच्या ठिकाणी आणि प्रवास करताना मास्क बंधनकारक
धुळे, दि. 1 (जिमाका वृत्तसेवा) : धुळे
जिल्ह्यात सोमवार 5 ऑक्टोबर 2020 पासून
हॉटेल, रेस्टॉरंट व बार आदी सेवा जास्तीत जास्त 50 टक्के क्षमतेसह किंवा स्थानिक प्रशासन निश्चित करेल त्या क्षमतेसह सुरु होतील.
तसेच सार्वजनिक, कामाच्या ठिकाणी आणि प्रवास करताना
प्रत्येक नागरिकाने चेहऱ्यावर मास्क बांधणे बंधनकारक करण्यात आले आहे. याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी संजय यादव यांनी काढले आहेत.
जिल्हाधिकारी श्री.
यादव यांनी म्हटले आहे, सार्वजनिक आरोग्य विभाग, मंत्रालय
मुंबई यांच्या 14 मार्च, 2020 रोजीच्या
आदेशान्वये कोरोना विषाणूचा (COVID19) प्रादुर्भाव रोखण्यासाठी
राज्यात साथ रोग प्रतिबंधात्मक कायदा 13 मार्च 2020 पासून लागू आहे. त्यातील तरतुदींच्या अंमलबजावणीसाठी
अधिसूचना निर्गमित केली आहे. त्यानुसार जिल्हाधिकारी हे त्यांच्या
कार्यक्षेत्रात कोरोना विषाणूवर नियंत्रण आणण्यासाठी व त्याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी
ज्या उपाय योजना करणे आवश्यक आहे त्यासाठी सक्षम प्राधिकारी आहेत. राज्य शासनाच्या 2 सप्टेंबर 2020 रोजीच्या आदेशान्वये लॉकडाऊनचा कालावधी 30 सप्टेंबर
2020 पर्यंत वाढविला होता. आता लॉकडाऊन कालावधी
31 ऑक्टोबर 2020 पर्यंत वाढविण्यात आला
आहे. तसेच राज्य शासनाच्या 30 सप्टेंबर, 2020 रोजीच्या आदेशानुसार लॉकडाऊन कालावधीत लागू केलेले निर्बंध शिथील करण्याबाबत
निर्देश दिले आहेत. त्यानुसार जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती
व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष श्री. यादव यांनी आपत्ती व्यवस्थापन कायद्यान्वये पुढील
प्रमाणे आदेश दिले आहेत.
मास्कचा वापर
करणे : धुळे जिल्ह्यातील सर्व नागरिक, व्यक्तींनी सार्वजनिक ठिकाणी,
कामाच्या ठिकाणी व प्रवास करताना
चेहऱ्यावर मास्क लावणे बंधनकारक राहील. Social Distancing चे पालन करणे : धुळे जिल्ह्यातील
सर्व नागरिक, व्यक्तींनी सार्वजनिक ठिकाणी कमीत कमी 6 फूट (दो गज की दुरी) शारीरिक अंतर
ठेवणे आवश्यक राहील. दुकान चालक, मालकांनी ग्राहकांना सेवा देण्यासाठी Social Distancing चे पालन करुन एका
वेळी पाच पेक्षा जास्त
ग्राहकांना प्रवेश देवू नये. समूहाने एकत्र जमणे :
मोठ्या प्रमाणात गर्दी होणारे कार्यक्रम, सभा बंदच
राहतील. लग्नसमारंभाकरीता जास्तीत जास्त 50, तर अत्यंविधीकरीता जास्तीत जास्त 20 लोकांना उपस्थित
राहता येईल. सार्वजनिक ठिकाणी थुंकण्यास बंदी राहील. सार्वजनिक ठिकाणी पान, गुटखा,
तंबाखू व दारू आदींचे सेवन करण्यास बंदी राहील. या बाबींचे
उल्लंघन करणारी व्यक्ती, नागरिक, आस्थापना,
घटकांवर स्थानिक प्रशासनाकडून
दंडात्मक कारवाई करण्यात येईल.
Work From Home : कामाच्या ठिकाणी, व्यवसायाच्या ठिकाणी, दुकाने, मार्केट्स, औद्योगिक आस्थापना
व वाणिज्य आस्थापनांच्या ठिकाणी घरुनच काम करण्यावर भर देण्यात यावा. स्क्रीनिंग व वैयक्तिक स्वच्छता राखणे
: कामाच्या ठिकाणी
प्रवेश व निर्गमन करताना थर्मल स्क्रीनिंग करणे, हात धुणे, सॅनिटाईजरचा वापर करणे इत्यादी बंधनकारक राहील. निर्जंतुकीकरण करणे : कामाच्या ठिकाणी, एकत्रित सुविधा देण्याच्या ठिकाणी,
नागरिक, व्यक्तींच्या संपर्कात येणारे सर्व ठिकाणे
(उदा. दरवाज्यांचे हँडल्स, शीफ्ट बदलताना संपूर्ण ठिकाणी)
निर्जंतुकीकरण करणे अनिवार्य राहील. Social Distancing : कामाच्या
ठिकाणी सर्व कामगार,
मजुरांनी दोन शीफ्टमधील अंतराच्या वेळी,
जेवताना, Social Distancing चे पालन करणे अनिवार्य
राहील. प्रतिबंधित (Containment Zone) क्षेत्र : राज्य शासनाच्या
आदेशानुसार प्रतिबंधित (Containment Zone) क्षेत्र घोषित करण्याबाबतचे
नियम पुढील आदेश होईपावेतो लागू राहतील. प्रतिबंधित क्षेत्राचे
सीमांकन व निर्बंध हे केंद्र सरकार व राज्य शासनाकडून वेळोवेळी निर्गमित केलेल्या आदेशानुसार
पुढील आदेश होई पावेतो लागू राहतील.
लॉकडाऊन कालावधीत
धुळे जिल्ह्यात पुढील बाबी, घटक, आस्थापना पूर्णपणे बंद राहतील : सर्व
शाळा, महाविद्यालये, शैक्षणिक, प्रशिक्षण, कोचिंग संस्था बंद राहतील. तथापि, ऑनलाईन, दूरस्थ शिक्षण प्रक्रिया
सुरु राहतील. सर्व सिनेमागृहे, स्वीमिंग
पूल, मनोरंजन पार्क्स, चित्रपटगृहे
( मॉल्स व मार्केट कॉम्प्लेक्स सह), ऑडिटोरीअम्स,
सभागृहे व तत्सम ठिकाणे.
सर्व प्रकारचे आंतरराष्ट्रीय प्रवासी हवाई वाहतूक. (भारत सरकार यांनी परवानगी दिलेले हवाई वाहतूक सेवा वगळून), सर्व सामाजिक,
राजकीय, क्रीडा, मनोरंजन,
शैक्षणिक, सांस्कृतिक, धार्मिक कार्यक्रम व इतर प्रकारचे मोठ्या
प्रमाणावर गर्दी होणारे सर्व कार्यक्रम. सर्व धार्मिक स्थळे,
प्रार्थनास्थळे, धार्मिक सभा, धार्मिक परिषदा, धार्मिक ठिकाणे बंद राहतील.
अत्यावश्यक (Essential) सेवा व अत्यावश्यक सेवा वगळून (Non-Essential) सेवा पुरविणारे
सर्व दुकाने सकाळी
9 ते सायंकाळी 7.30 वाजेपावेतो सुरु राहतील.
तसेच धुळे महानगरपालिका हद्दीत आयुक्त, धुळे शहर
मनपा यांनी निर्गमित केलेल्या आदेशात नमूद अटी व शर्तीनुसार Essential व Non-Essential सेवा पुरविणारी दुकाने, आस्थापना सुरु राहतील. राज्य शासनाकडून व या कार्यालयाकडून
वेळोवेळी निर्गमित केलेल्या आदेशानुसार नमूद केलेल्या बाबी 31 ऑक्टोंबर, 2020 पर्यंत सुरु राहतील. तसेच धुळे जिल्ह्यात 5 ऑक्टोबर 2020 पासून हॉटेल्स, रेस्टॉरंट्स व बार इत्यादी सेवा जास्तीत
जास्त 50 टक्के क्षमतेसह किंवा स्थानिक प्रशासनाद्वारे निश्चित
करण्यात येईल त्या क्षमतेसह सुरु राहतील. तसेच याबाबतची नियमावली
(SOP) शासनाकडील पर्यटन विभागाकडून स्वतंत्ररित्या निर्गमित करण्यात
येणार आहे. राज्यातंर्गत व राज्याबाहेर ऑक्सिजनची वाहतूक करणारी
सर्व वाहने, ऑक्सिजनची निर्मिती करणारे घटक व ऑक्सिजनचा पुरवठा
करणारे पुरवठादार यांची ऑक्सिजन घेऊन जाणारी वाहनांना वेळेच्या कोणत्याही बंधनाशिवाय वाहतूक
करण्यास मुभा राहील. राज्यांतर्गत रेल्वे वाहतूक सुरु राहतील.
कोरोना विषाणूच्या
अनुषंगाने प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्याबाबत महाराष्ट्र शासनाकडून वेळोवेळी निर्गमित
करण्यात आलेले आदेश, निर्देश, नियमावली
(SOPs) नुसार या कार्यालयाकडून वेळोवेळी निर्गमित करण्यात आलेले आदेश
लागू राहतील. या आदेशाचे
उल्लंघन केल्यास भारतीय दंड संहिता, 1860 (45) चे कलम
188, आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 मधील कलम
51 ते 60 तरतुदीनुसार शिक्षेस संबंधित पात्र राहील. तसेच
राज्य शासनाकडून वेळोवेळी निर्गमित केलेले, वर नमूद केलेल्या
नियमावली (SOPs) नुसार या कार्यालयाकडून वेळोवेळी निर्गमित केलेले
आदेश लागू राहतील, असेही जिल्हाधिकारी श्री. यादव यांनी म्हटले आहे.
