सोनगीर प्रतिनिधी- सोनगीर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश व्ही पाटील यांना गोपनीय बातमी द्वारे माहिती प्राप्त झाली होती की धुळे कडून दोंडाईचा कडे बेकायदेशीर दारूची वाहतूक होणार आहे या बातमीनुसार पोलिसांनी सापळा रचून धुळे कडून दोंडाईचा कडे जाणारी लाल रंगाची आयशर गाडी क्रमांक एम एच 18 बीजी 1905 यामध्ये दारू घेऊन जात असताना दोंडाईचा रोडवरील धनश्री हॉटेल जवळ सापळा रचून गाडी पकडण्यात आले या गाडीची तपासणी केली असता त्यामध्ये झाडू भरले आहेत व झाडू ची बिल्टी त्यांनी सादर केली मात्र सदर गाडीची तपासणी केली असता सदर गाडीमध्ये मोठ्या प्रमाणावर दारू साठा आढळून आला या 2, 51 ,400 रुपये किमतीच्या रॉयल चॅलेंजर व्हिस्कीच्या बाटल्या, 2 ,40 ,000 रु किमतीच्या सिग्नेचर ग्रीन व्हिस्की बॉक्स वाटल्या , 2, 18 ,400 रुपये किमतीच्या इंपिरियल ब्ल्यू ग्रीन व्हिस्कीच्या बाटल्या, 13 ,680 रुपये किमतीच्या अम्ब्रेला होडका या कंपनीच्या बाटल्या, 20,520 रुपये किमतीच्या आम्ब्रेला ओडखा ग्रीन कंपनीच्या बाटल्या, 1,80,000 रुपये किमतीच्या ब्लेंडर प्राइड प्रेमियम व्हिस्की , 1,45,200 रुपये किमतीच्या इम्पेरियल बल्यू अंड ग्रीन व्हिस्कीच्या बाटल्या , 26 ,000 रुपये किमतीच्या टरबो प्रेमियम बियर स्ट्रॉंग चे बॉक्स व 10 लाख रुपये किंमतीची आयशर कंपनीची गाडी असा एकूण 18 लाख 42 हजार रुपये किमतीच्या विदेशी दारू व दहा लाख रुपये किमतीच्या आयशर वाहन पोलिसांच्या कारवाईत पकडण्यात आला असून सदर दारू आणि बीयरची महाराष्ट्र राज्यातील किंमत 20 लाख 16 हजार 720 रुपये एवढी आहे .सदरचा दारू आणि बियर ही केंद्रशासित प्रदेश दमन या ठिकाणी विक्री करण्याबाबतची परवानगी असता देखील महाराष्ट्र राज्यात विक्री करण्याकरता वाहतूक करताना आरोपी मुकेश वरदु जयस्वाल ,वय 27 रा. संयोग नगर, गांधी पॅलेस इंदोर , व फारूक जफर शेख रा. 101 शिरपूर काकड सागर पॅलेस इंदोर यांच्या कब्जात मिळून आल्याने दोन्ही आरोपींच्या विरोधात पंचांसमक्ष कारवाई करून विचारपूस केली असता त्यांच्याकडे कोणत्याही दारूचा परवाना आढळून आला नाही व सदरचा माल भिवंडी वरून आमच्या ताब्यात देण्यात आला व अहमदाबाद येथे ये घेऊन जाणार होतो अशी माहिती त्यांनी सोनगीर पोलिसांना दिली आहे त्यामुळे महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलम 65 या प्रमाणे त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
सदरची कार्यवाही मा.पोलीस अधीक्षक चिन्मय पंडित, अप्पर पोलीस अधीक्षक राजू भुजबळ ,उपविभागीय पोलिस अधिकारी श्रीकांत घुमरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रकाश पाटील पोलिस उपनिरीक्षक नामदेव सहारे पोलीस कॉन्स्टेबल शिरीष भदाने ,सदे सिंग चव्हाण ,अतुल निकम ,इत्यादींच्या पथकाने केली असून सदर गुन्हा चा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक नामदेव सहारे करत आहेत.
Tags
news
