शिरपूर : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातर्फे घेण्यात आलेल्या एम. फार्मसी परीक्षेचा निकाल जाहीर झालेला असून शिरपूर येथील आर. सी. पटेल फार्मसी कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश प्राप्त करुन उत्तुंग भरारी घेतली आहे.
विशेष म्हणजे फार्मसी च्या सर्व शाखां मध्ये आर. सी. पटेल फार्मसी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यानी विद्यापीठात गुणवत्ता यादीत मान पटकावला आहे.
व्दितीय वर्ष एम. फार्मासुटीक्स विषयातून शुभम राठी ९.२२ सीजीपीए गुण प्राप्त करुन विद्यापीठात प्रथम क्रमांक पटकावला आहे. सचिन चंदनकर ९.१८ द्वितीय, शितल कुवर ८.६७ चतुर्थ, विक्रम जाधव ८.६४ पाचवा, शुभम चोपडे ८.६३ सीजीपी.ए गुण प्राप्त करून उमवि मध्ये सहावा क्रमांक प्राप्त केला.
व्दितीय वर्ष फार्मास्युटिकल केमिस्ट्री या विभागात मंगेश पाटील ९.३५, सागर कासार ९.२२, आशिष धोटे ९.२२, प्राजक्ता मस्के ९.०५ असे सी.जी.पी.ए. गुण प्राप्त करून महाविद्यालयात व विद्यापीठातून अनुक्रमे प्रथम ते चतुर्थ क्रमांक प्राप्त केले.
व्दितीय वर्ष एम. फार्मसी फार्माकॉलॉजी शाखेतून शिवानी वाघ ९.२९, अविनाश वाडकर ८.९३, प्रियंका व्यास ८.६२ असे सी.जी.पी.ए. गुण प्राप्त करून महाविद्यालयात व विद्यापीठातून अनुक्रमे प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांकाने यशस्वी झाले.
व्दितीय वर्ष एम. फार्मसी फार्माकोग्नोसी विषयातून स्वाती चव्हाण ९.३१, पूजा मुरकुटे ९.२९, प्रतीक्षा मराठे ८.९० सी.जी.पी.ए. गुण प्राप्त करून महाविद्यालयात व विद्यापीठातून अनुक्रमे प्रथम, द्वितीय व चतुर्थ क्रमांक मिळविला.
क्वालिटी अशुरन्स शाखेतून व्दितीय वर्ष एम. फार्मसी चे नुपूर बाहेती ९.४८, कोमल भोई ९.४४ सीजीपीए गुण प्राप्त करून महाविद्यालयात व विद्यापीठातून अनुक्रमे प्रथम व द्वितीय क्रमांक मिळवला. तसेच अर्जुन चव्हाण, आदित्य जोशी, अमोल सूर्यवंशी या तिनही विद्यार्थ्यांनी ९.३१ सी.जी.पी.ए. गुण प्राप्त करून महाविद्यालयात व विद्यापीठातून अनुक्रमे चतुर्थ, पाचवा व सहावा क्रमांक प्राप्त केला.
क्लिनिकल फार्मसी शाखेतून व्दितीय वर्ष एम. फार्मसी चे हॅप्पी लुल्ला यांनी ९.१४, सिद्धार्थ सावदेकर ८.९९, प्रतीक्षा काकुस्ते ८.५९ असे सी.जी.पी.ए. गुण प्राप्त करून महाविद्यालयात व विद्यापीठातून अनुक्रमे प्रथम व द्वितीय क्रमांक प्राप्त केला.
सर्व टॉपर्स व उत्तीर्ण विद्यार्थ्यांनी आपल्या यशाचे श्रेय महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय सुराणा, उपप्राचार्य डॉ. अतुल शिरखेडकर, डॉ. श्रीमती एस. डी. पाटील, डॉ. एच. एस. महाजन, डॉ. एस. एस. चालीकवार, डॉ. एम. जी. कळसकर, रजिस्ट्रार जितेश जाधव, सर्व प्राध्यापक, कर्मचारी यांना दिले.
यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष माजी मंत्री अमरिशभाई पटेल, कार्याध्यक्ष भूपेशभाई पटेल, उपाध्यक्ष राजगोपाल भंडारी, माजी कुलगुरू डॉ. के. बी. पाटील, प्राचार्य डॉ. संजय सुराणा, उपप्राचार्य डॉ. अतुल शिरखेडकर आदींनी कौतुक केले व उज्ज्वल भवितव्यासाठी शुभेच्छा दिल्या.
Tags
news
