शिरपूर तालुका पोलीस स्टेशन सांगवी यांनी बोराडी परिसरातील गांजा शेती वर कारवाई केली असून या कारवाईत 5 लाख 90 हजार रुपयांच्या गांजा सदस्य अमली पदार्थ झाडे आणि पाला असा मुद्देमाल जप्त केला आहे
याबाबत सांगवी पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील यांना गोपनीय बातमीदार यांचेकडून माहिती प्राप्त झाली होती सदर माहितीच्या अनुषंगाने एक पथक तयार करून बोराडी परिसरातील दुर्गम भागात छापा टाकला असता सदर ठिकाणी एकलव्य पाडा बोराडी येथे डोंगर सिंग पावरा यांच्या शेतात तूर व कापूस पिकाच्या आडोशाला गांजाची हिरवी झाडे लागवड केलेली दिसून आले यावेळी बाजूला बारकाईने तपासणी केली असता या शेतालगत इसम गब्बरसिंग तिरंगा पावरा त्याच्या शेतात देखील अशाच प्रकारची झाडे आढळून आले या दोन्ही शेतांमधुन गांजाची झाडे जप्त करण्यात आली असून 2 लाख 90 हजार रुपये किमतीचे गांजा सदृश्य अमली पदार्थाची झाडे व 3 लाख रुपये किमतीचे 300 kg वजनाचे गांजा सदृश्य पदार्थाच्या वनस्पती ची ओले जाडे असा एकूण 5 लाख 90 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे
दिनांक 18 ऑक्टोबर रोजी सदरची कारवाई करण्यात आली असून तालुका पोलीस स्टेशन येथे पोलीस हवालदार हेमंत फुलपगारे यांच्या तक्रारीवरून एनडीपीएस कायदा कलम 20- 22 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे वरील दोन्ही आरोपींना पोलिसांनी शिताफीने पकडून ताब्यात घेतले असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक दीपक वारे करत आहेत .
सदरची कारवाई ही पोलीस अधीक्षक चिन्मय पंडित ,अपर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव, उपविभागीय पोलिस अधिकारी अनिल माने यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक अभिषेक पाटील पोलीस सब इन्स्पेक्टर खैरनार, दीपक वारे पोलीस कॉन्स्टेबल लक्ष्मण गवळी, संजय जाधव ,संजय धनगर ,प्रेमसिंग गिरासे ,पवन गवळी ,भूषण चौधरी ,योगेश दाभाडे, योगेश मोरे ,जामसिंग पावरा, आरिफ पठाण ,रामदास बारेला ,महिला कर्मचारी अश्विनी चौधरी, शितल खैरनार इत्यादीच्या पथकाने केली आहे
Tags
news
