सोनगीर - सोनगीर पोलीसांनी भरधाव वेगात कंटेनर न थांबवता पळून जातांना पोलिसांनी शिताफीने पाठलाग करत कंटेनरला आडवले.आणि 65 गोवंश जनावरांची सुटका केली यात 9 जनावारांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.एकुण 26 लाखाचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला आहे.
आज दि 18 रोजी सोनगीर पोलीस स्टेशनचे साहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश पाटील यांना गुपीत माहिती प्राप्त झाली होती.त्या माहितीच्या आधारे प्रकाश पाटील यांच्यासह उपनिरीक्षक नामदेव सहारे,पोहेकॉ विजय पाटील, मनोहर चव्हाण,शीरीष भदाणे,सुरजकुमार सावळे,संजय देवरे आदींनी सकाळी 6:30 वाजेच्या सुमारास मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील टोलनाका जवळ सापळा रचला.यावेळी मध्यप्रदेश कडून धुळेकडे यु.पी 21 बि एन 8386 हा कंटेनर भरधाव वेगाने येत असतांना त्याला थांबविण्यासाठी प्रयत्न केला असता पोलीस असल्याचे पाहुन न थांबता पळून गेला.धुळे जवळील चाळीसगांव चौफुली येथे पोलिसांना सांगून कंटेनरला आडविण्यात आले.यावेळी कंटेनर चालक व क्लिनर कंटेनर थांबवून पळून गेले.कंटनेरच्या मागचा दरवाजा उघडून बघितले असता कंटेनर मध्ये दाटीवाटीने गोवंश जातीचे जनावरांना दोरखंडाने पाय बांधून निर्दयतेने कोंबलेल्या अवस्थेत आढळले.त्या गोवंश जनावरांची सुटका केली असता त्यात एकुण 65 जणावरे मिळुन आले.यात 9 जणावरे मयत स्थितीत आढळले.65 जनावरांची किंमती 6 लाख 11 हजार तर कंटेनरची किंमत 20 लाख असा एकुण 26 लाख 11 हजाराचा मुद्देमाल सोनगिर पोलिसांनी शिताफीने ताब्यात घेतला.
Tags
news
