शिरपूर : येथील शिरपूर एज्युकेशन सोसायटी, "शिरपूर ६०" व मुकेशभाई पटेल मिलिटरी स्कूल च्या तब्बल ५० विद्यार्थ्यांनी नीट (वैद्यकीय प्रवेश) परीक्षेत घवघवीत यश संपादन केले असून उंच भरारी घेऊन यशोशिखरावर पोहचले. ही सर्वांसाठी आनंददायी बाब आहे.
अतिशय लहानशा अशा शिरपूर तालुक्यातून तब्बल ५० विद्यार्थ्यांनी नीट परीक्षेत यश संपादन करणे ही फार मोठी भूषणावह व आश्चर्यचकित करणारी बाब ठरली असून सर्वत्र मोठ्या प्रमाणात आनंद व्यक्त करण्यात येत आहे. नीट - २०२० परिक्षेत भरघोस गुण प्राप्त करुन सर्व ५० विद्यार्थी वैद्यकिय प्रवेशासाठी पात्र ठरले असून त्यांनी उत्तुंग भरारी घेत आकाशाला गवसणी घातली आहे.
आर. सी. पटेल विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय शिरपूर - येथील २३ यशस्वी विद्यार्थी -
आयुष चंद्रकांत पवार (ओपन) या विद्यार्थ्याने ६७१ (७२० पैकी) गुण मिळवून जबरदस्त कामगिरी पार पाडली. प्रथमेश किशोर जोशी ५६७ गुण (ओपन), वरुण रविंद्र चौधरी ५२९ (ओबीसी) यांनी देखील यशस्वी प्रयत्न केले. तसेच संकेत पाटील ४६० गुण (ओपन), विपुल माळी ४०९ गुण (ओबीसी), नचिकेत महाजन, रुपेश विनोद माळी, देवेंद्र जितेंद्र जोशी, स्वप्नील शिवदे, गौरव अरुण चौधरी, अरविंद रविंद्र शिंदे, दीपक नंदलाल लोहार, सचिन कैलास अहिरे, यश साळुंके, सागर मनोज निकम, शिवम जितेंद्र जाला, गोपाल रवीचंद्र खैरनार, हेमंत संतोष मराठे, चेतन सुभाष माळी, दीपेश पुरुषोत्तम पाटील, नितीन खैरनार, मुकूल दत्तात्रय पाटील, जयेश सुनील बंजारा यांनी यश संपादन केले.
एच. आर. पटेल कन्या विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय शिरपूर -
यशस्वी १२ विद्यार्थिनी - कुमुदिनी मोहन दोरीक, नेहा सुहास ढोले, अंजना सुकलाल पावरा, दिपांक्षा चंद्रकांत सोनवणे, रचना जयदेव पाटील, सेजल तेजस जैन, गीताक्षी विजय महाजन, काजल प्रदीपसिंह देशमुख, जान्हवी रामचंद्र वाघ, सुषमा उदय मराठे, एकता शिकला पावरा, दिपाली इंदास बोरसे यांनी चांगले गुण प्राप्त करून यश पदरी पाडले.
"शिरपूर ६०" अंतर्गत एकूण १५ यशस्वी विद्यार्थी. यात श्री विले पार्ले केळवणी मंडळ मुंबई संचालित तांडे ता. शिरपूर येथील मुकेशभाई पटेल मिलिटरी सायन्स ज्युनिअर कॉलेजचे ३ विद्यार्थी प्रतीक्षा ओंकार राऊत, दिव्यानी जयसिंह गिरासे, आनंद परदेशी हे यशस्वी झाले. तसेच आर सी पटेल आश्रम विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय निमझरी चे ६ विद्यार्थी - संदीप रायसिंग पावरा, शांतीलाल पावरा, सागर रवींद्र पावरा, उज्ज्वला पावरा, सोनिया पावरा, ईनेश गंगाराम पावरा हे यशस्वी ठरले. आर. सी. पटेल इंग्लिश मीडियम जुनिअर कॉलेज शिरपूरचे ६ विद्यार्थी - हर्षा पावरा, यज्ञेश पाटील, विनय राव, आदित्य दधानिया, जिग्नेश संकलेचा, प्राजक्ता खैरनार यांनी यश मिळविले.
त्यांच्या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष माजी शिक्षणमंत्री अमरिशभाई पटेल, संस्थेचे कार्याध्यक्ष भुपेशभाई पटेल, उद्योगपती चिंतनभाई पटेल, उपाध्यक्ष राजगोपाल भंडारी, सचिव प्रभाकरराव चव्हाण, सीईओ डॉ. उमेश शर्मा, प्राचार्य पी. व्ही. पाटील, प्राचार्य आर. बी. पाटील, प्राचार्य दिनेशकुमार राणा, प्राचार्य सचिन पाटील, प्राचार्य पी. डी. पावरा व सर्व शिक्षक यांनी कौतुक केले आहे
श्री विले पार्ले केळवणी मंडळ मुंबई या संस्थे मार्फत अध्यक्ष माजी मंत्री अमरिशभाई पटेल व सह-अध्यक्ष भूपेशभाई पटेल, स्व. तपनभाई पटेल यांनी सुरू केलेल्या “शिरपूर ६०” योजने अंतर्गत १५ विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केल्याने समाधान व्यक्त करण्यात आले.
“शिरपूर ६०” योजनेसाठी शिरपूर तालुक्यातील आदिवासी विद्यार्थी बांधव व इतर गुणवंत विद्यार्थी यांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी मुकेश आर. पटेल मिलीटरी ज्युनिअर कॉलेज तांडे ता. शिरपूर येथे राहण्याची, अभ्यासाची तसेच सर्व सोयीसुविधा अशी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे.
स्व. तपनभाई पटेल यांच्या संकल्पनेतून व अध्यक्ष अमरिशभाई पटेल, सह-अध्यक्ष भुपेशभाई पटेल यांच्या अथक प्रयत्नातून "शिरपूर ६०" योजना सुरू करण्यात आली. यापुढे मोठ्या संख्येने विद्यार्थी यश प्राप्त करतील यादृष्टीने नियोजन करण्यात आले आहे. संस्थे मार्फत करण्यात आलेल्या अनेक वर्षांच्या परिश्रमाचे हे फलीत आहे. आता शिरपूर तालुक्यात निश्चितच स्पर्धात्मक परीक्षांचे सुदृढ वातावरण तयार करण्यात आम्ही यशस्वी ठरत आहोत. यासाठी सर्वांचे परिश्रमपूर्वक प्रयत्न असल्याचे संस्थेचे अध्यक्ष माजी मंत्री अमरिशभाई पटेल, कार्याध्यक्ष भुपेशभाई पटेल यांनी सांगून विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल आनंद व्यक्त केला.
