शिरपूर प्रतिनिधी - शिरपूर तालुक्यातील थाळनेर पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन साळुंखे आणि त्यांच्या पथकाला परिसरातील चोरीस गेलेल्या मोटर सायकली हस्तगत करण्यात यश आले असून पोलिसांच्या कारवाईत 12 मोटरसायकली ज्यांची अंदाजित किंमत 3 लाख 50 हजार रुपये हस्तगत करण्यात यश आले आहे .
याबाबत सविस्तर वृत्त असे की थाळनेर पोलिस स्टेशन येथे दिनांक 24 रोजी गुन्हा रजिस्टर नंबर 59 /2020 भादवि कलम 379 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता सदर गुन्ह्यात मोटरसायकल क्रमांक यु.पी. 77 - 8006 मोटारसायकल अज्ञात चोरट्याने चोरून नेली होती याबाबत अधिक तपास करत असताना चोरीस गेलेली मोटरसायकल पेट्रोलिंग करत असताना रविंद्र सुरेश सावळे राहणार थाळनेर याच्याकडे आढळून आली होती. याबाबत अधिक तपास केला असता त्याने ही मोटरसायकल दोन-तीन दिवसांपूर्वी थाळनेर गावातील मुन्ना ईशी याच्याकडून विकत घेतल्याची माहिती दिली सुरज उर्फ मुन्ना मायकल संतोष ईशी राहणार संत गाडगेबाबा नगर थाळनेर याच्या शोध घेऊन त्याच्याकडे रविंद्र सुरेश सावळे यांना विकलेल्या मोटरसायकल बाबत विचारपूस करता त्याने प्रथम उडवाउडवीची उत्तरे दिली यानंतर सखोल चौकशी केली असता त्याने सदरची मोटरसायकल ही मागील पाच सहा दिवसांपूर्वी थाळनेर पोलीस स्टेशन हद्दीतील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 3 लगत असलेल्या शिरपूर फाटा येथील होटल वेलकम जवळून चोरी केल्याची कबुली दिली त्याला विश्वासात घेऊन अधिक चौकशी केली असता त्याचे साथीदार मनोज उर्फ टॅब मच्छिंद्र सावळे राहणार थाळनेर व राकेश पीतांबर बागुल राहणार रामसिंग नगर शिरपूर यांच्या कडून वरील मोटरसायकल व्यतिरिक्त शहादा जिल्हा नंदुरबार, अमळनेर जिल्हा जळगाव, चोपडा जिल्हा जळगाव, तसेच धुळे शहरातील सुरत बायपास जवळ वर्षी फाटा, बेटावद तालुका शिंदखेडा येथून विविध कंपनीच्या मोटर सायकल ही आणि दुचाकींची चोरी करून त्या मोटर सायकल थाळनेर पोलीस स्टेशन हद्दीतील पिळोदा ,थाळनेर, तसेच शिरपूर तालुक्यातील अर्थे, वाघाडी अशा ठिकाणी विकल्या याबाबत माहिती प्राप्त झाली त्यानुसार कारवाई करत पोलिसांनी इतर 11 मोटरसायकली असा एकूण अंदाजे किंमत 3 लाख 50 हजार रुपये किमतीच्या मोटारसायकली हस्तगत केले आहेत .
सदरची कारवाई हे मा. पोलीस अधीक्षक चिन्मय पंडित ,अप्पर पोलीस अधीक्षक श्री प्रशांत बच्छाव, उपविभागीय पोलिस अधिकारी अनिल माने यांच्या मार्गदर्शनाखाली थाळनेर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन साळुंखे ,पोलीस उपनिरीक्षक नवनाथ रसाळ, पोलीस कॉन्स्टेबल दिवाकर कोळी, सिराज खाटीक ,विजय जाधव, निलेश आव्हाड, नरेंद्र पवार ,उमेश आळंदे, कृष्णा पावरा ,होमगार्ड प्रवीण ढोले, अनील पावरा ,मुकेश कोळी, इत्यादींच्या पथकाने केले असून सेवानिवृत्त पोलीस हेडकॉन्स्टेबल रफिक शेख यांनी या कामात मदत केली आहे
Tags
news

ब्लॉग प्रशासकाने ही टिप्पण्णी हटविली आहे.
उत्तर द्याहटवा