एकनाथ खडसे उद्या शिरपूर शहरात आगमन,राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तर्फे स्वागत सत्कार समारंभ





शिरपूर - राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते एकनाथ खडसे उद्या शिरपूर शहरात येत असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तर्फे स्वागत सत्कार समारंभ आयोजित केला आहे.
तापी खोऱ्याला सुजलाम सुफलाम करणारे जलनायक माजी महसूल व कृषीमंत्री  एकनाथरावजी खडसे साहेब यांचे उद्या दिनांक 31 ऑक्टोबर वार शनिवार रोजी शिरपूर तालुक्यात आगमन होत आहे.

       राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेशानंतर नाथाभाऊ प्रथमच शिरपूर तालुक्यात येत असून त्यांच्या स्वागत सत्कारासाठी सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सोशल डिस्टन्स ठेवून उपस्थित राहावे असे आव्हान राष्ट्रवादी चे जेष्ठ नेते डॉ जितेंद्र ठाकूर आणि डॉ मनोज महाजन, तालुका अध्यक्ष रमेशआबा करंकाळ व शहर अध्यक्ष युवराज राजपूत यांनी केली आहे.
उद्या तालुक्यात त्यांचा सत्कार हिसाळे- 4.वा,
बभळाज  - 4:15, असली तांडे- 4:30, दहिवद फाटा- 4:45, कळमसरे - 5:00, करवंद नाका- 5:15, निमझरी नाका- 5:30 आगमन होताना होणार असून मनोमंगल कार्यालय  वाघाडी रस्ता, शिरपूर. 5:45 वाजेला एकनाथ खडसे यांचा सत्कार करण्यात येणार आहे. आणि ते कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत अशी माहिती देण्यात आली आहे.




Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने