नाशिक ला प्रहार जनशक्ती पक्षाच्यावतीने NHAI च्या ऑफिसला दिले डांबर भेट.




नाशिक  जिल्हा प्रतिनिधी शांताराम दुनबळे यांजकडून  
नाशिक - :जिल्ह्यातील इगतपुरी ते मालेगाव नॅशनल हायवे क्र. 3 या रस्त्याला खड्ड्यांची चाळण झालेली आहे अनेक मृत्यू खड्ड्यांमुळे होत आहे तसेच वाडीवऱ्हे येथील बऱ्याच गाई-म्हशींचे पण मृत्यू होत आहे. ओझर पिंपळगाव या ठिकाणी तर अक्षरशः एक एक तास गाड्यांच्या रांगा असतात. या सर्व संदर्भात प्रहार जनशक्ती पक्ष नाशिक जिल्हा प्रहारच्या वतीने NHAI च्या ऑफिसला दिले डांबर भेट आणि पुढील आठ दिवसात जर हे खड्डे बुजवले नाही. तर प्रहारच्या वतीने NHAI च्या अधिकाऱ्यांच्या तोंडाला लावणार डांबर.
यावेळी प्रहार जनशक्ती पक्ष नाशिक जिल्हा प्रमुख अनिल भडांगे , उपजिल्हाप्रमुख अमजद पठाण , जिल्हा संघटक मोतीलाल चव्हाण , सह सरचिटणीस वैभव देशमुख , शहरप्रमुख श्याम गोसावी आदी उपस्थित होते.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने