श्रीगणेश मूर्ती विटंबणासाठी दोषींवर तातडीने कार्यवाही होणेबाबत मनसेचे नाशिक मनपा आयुक्तांना निवेदन




नाशिक जिल्हा  प्रतिनिधी  शांताराम दुनबळे यांजकडून 
नाशिक - :महानगरपालिका व विविध सामाजिक संघटनांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे अनंत चतुर्दशीच्या दिवशी पर्यावरण रक्षणाच्या उद्देशाने श्री गणेश मूर्तींचे संकलन करण्यात आले होते. या मूर्ती नंतर विधिवत विसर्जन न करता महानगरपालिकेने ठरविलेल्या विविध विसर्जनाच्या ठिकाणांवर अत्यंत चुकीच्या पद्धतीने फेकल्याने मूर्तींचे अवयव तुटून या मूर्तींची घोर विटंबणा झाली आहे. श्री गणेशाची आपल्या घरात, मंडळात प्राणप्रतिष्ठा करून दहा दिवस अत्यंत भक्तिभावाने पुजा अर्चना करणाऱ्या भक्तांच्या भावना या निंदनीय प्रकाराने प्रचंड दुखावल्या गेल्या आहेत. नुकत्याच बहरीन या मुस्लीम देशात गणेश मूर्तीची विटंबणा करणाऱ्या एका महिलेवर तेथील पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. मात्र हिंदुस्तानात आणि तेही हिंदु धर्माच्या नावावर राजकारण करून सत्तेत येणाऱ्या सत्ताधाऱ्यांच्या राज्यात प्रशासनाच्या वतीनेच या प्रकारे श्री गणेश मूर्तींची विटंबणा होणे अत्यंत दुखःद आहे. 
 महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली आहे की मा. आयुक्त तात्कालिक या प्रकाराची गंभीर दखल घेऊन श्रींच्या या मूर्तींचे पुन्हा विधिवत विसर्जन करून, अश्या प्रकारे श्री गणेश मूर्तीची विटंबणा करणाऱ्या दोषी व्यक्तींवर योग्य ती कार्यवाही करावी, अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे तीव्र स्वरूपाचे आंदोलन उभारून दोषी अधिकाऱ्यांना जाब विचारण्यात येईल व याची सर्व जबाबदारी आपल्या प्रशासनाची राहील असा इशारा निवेदनात देण्यात आला आहे. 
निवेदनावर महाराष्ट्र नवनिर्माण सेना शहराध्यक्ष अंकुश पवार, उपजिल्हाध्यक्ष मनोज घोडके, विभाग अध्यक्ष नितीन साळवे, सत्यम खंडाळे, विक्रम कदम, नगरसेविका नंदिनीताई बोडके, सलीम (मामा) शेख, योगेश शेवरे, वैशालीताई भोसले, उपशहराध्यक्ष अक्षय खांडरे, मनविसे प्रदेश उपाध्यक्ष संदिप भवर,मनविसे जिल्हाध्यक्ष कौशल बब्बू पाटील,मनविसे शहराध्यक्ष सौरभ सोनवणे,अजिंक्य गीते,जिल्हा सचिव संदेश जगताप,शारीरिक सेना शहराध्यक्ष विजय आगळे, सिद्धेश सानप यांच्या सह्या आहेत.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने