धुळे - पिंपळनेर म.रा.वि.वि.कंपनी चा सहाय्यक अभियंता संजय कौतिक माळी वय-51वर्ष, म.रा.वि.वि.कंपनी पिंपळनेर शहर कक्ष पिंपळनेर जि.धुळे लुचपत विभागाच्या जाळ्यात अडकला असून 4 हजाराची लाच भोवली आहे.
तक्रारदार- पुरुष, वय-43 वर्ष रा.पिंपळनेर यांनी केलेल्या तकरीच्या अनुषंगाने ही कारवाई करण्यात आली आहे.या प्रकरणात 4000 रु लाचेची मागणी करण्यात आली होती.
-यातील तक्रारदार यांना घरगुती वापरासाठी नविन मीटर घेणे असल्याने त्यांना नवीन मिटर मिळून देण्यासाठी तक्रारदार यांचे कडून आज दि.3 रोजी लोकसेवक यांनी नवीन मीटर देण्याचे मोबदल्यात तडजोडी अंती 4000 रुची मागणी तक्रारदार यांचेकडे केली होती .आरोपी लोकसेवक यांनी पंच साक्षीदार समक्ष लाचेची मागणी केली. त्या अनुषंगाने सापळा कारवाई केली असता,आरोपी लोकसेवक यांनी तक्रारदार यांचे कडून आज रोजी पंचांसमक्ष 4000 रु स्वतःच्या आर्थिक फायदयासाठी स्वीकारली. पंच साक्षीदार समक्ष आरोपी लोकसेवक यास ताब्यात घेऊन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कारवाई प्रकाश झोडगे, पोलीस निरीक्षक
ला.प्र.वि.धुळे,सहा. सापळा अधिकारी मंजीतसिंग चव्हाण पोलीस निरीक्ष, ला.प्र.वि.धुळे
पर्यवेक्षण अधिकारी सुनील कुराडे पोलीस उप अधीक्षक ला.प्र.वि. धुळे, संदीप सरग,सुधीर सोनवणे, प्रशांत चौधरी,कृष्णकांत वाडीले, भुषण शेटे पथकाने केली असून या साठी त्यांना सुनील कडासने सो.पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि, नाशिक निलेश सोनवणे सो.अपर पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि, नाशिक यांचे मार्गदर्शन लाभले.
Tags
news
