कोरोना ग्रस्त रुग्णांच्या मदतीसाठी प्रशासनाने शासनाच्या वतीने सर्वतोपरी प्रयत्न करावे - खासदार भारती ताई पवार





 नाशिक जिल्हा प्रतिनिधी शांताराम दुनबळे यांजकडून. 
नाशिक-: कोरोना ग्रस्त रुग्णांच्या मदतीसाठी प्रशासनाने शासनाच्या वतीने सर्वतोपरी प्रयत्न करावे , खासदारकी पदा बरोबरच भाजपा कार्यकर्ते मदतीसाठी सज्ज असून कोणालाही काही अडचणी भासल्यास स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या बरोबरच आम्हाला केव्हाही संपर्क करा असा इशारा खासदार डॉक्टर भारतीताई पवार यांनी येवला येथे दिला.
  
आज दुपारी खा, भारती ताई पवार यांनी बाभुळगाव येथील कोविड सेंटरला भेट दिली यावेळी त्या बोलत होत्या. त्यांच्यासमवेत भारतीय जनता पक्षाचे प्रदेश कार्यकारणी सदस्य ज्येष्ठ नेते बाबा डमाळे पाटील, तालुका अध्यक्ष डॉक्टर नंदकिशोर शिंदे ,प्राध्यापक नानासाहेब लहरे, शहराध्यक्ष तरंग गुजराथी,डॉक्टर उमेश काळे, राजेंद्र परदेशी ,भीमाजी सावंत,मयूर मेघराज आदी बरोबर होते. याप्रसंगी खासदार पवार यांनी तहसीलदार रोहिदास वारुळे, गट विकास अधिकारी डॉक्टर उमेश देशमुख, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर हितेंद्र गायकवाड,डॉक्टर कातकडे यांच्याशी चर्चा करत कोविड सेंटर मध्ये असणाऱ्या संपूर्ण कोरोणा ग्रस्तांची माहिती घेतली.खासदार भारती ताई पवार स्वतः डॉक्टर असल्यामुळे त्यांनी येवला तालुक्यातील  संपूर्ण कोरोना ग्रस्तांची    माहिती घेत  वैद्यकीय अधिकारी व प्रशासनाला  त्यांनी  काही उपाय योजना  सुचविल्या तर  उपचार, सुविधा,  जेवण  या सर्व बाबींवर  सखोल चर्चा केली,  खासदार पवार यांनी  काही रुग्णांशी चर्चा करत  त्यांच्या अडचणी समजावून घेतल्या  याप्रसंगी त्यांनी  काही मदत भासल्यास  आमच्याशी व स्थानिक कार्यकर्त्यांशी  मदत घ्या  असे त्यांनी यावेळी सांगितले.

 यावेळी  प्रभारी तालुका वैद्यकीय अधिकारी  डॉक्टर हितेंद्र गायकवाड  यांच्याविरोधात  कार्यकर्त्यांनी वेगवेगळ्या तक्रारी केल्या याबाबत  वरिष्ठांशी चर्चा करणार असल्याचे त्यांनी सांगितले. कोविड सेंटरच्या भेटीनंतर  खासदार भारतीताई पवार यांनी  काही खाजगी ठिकाणी भेटी दिल्या . यावेळी नागडे- कोटमगाव रस्त्याचे काम  करण्यात यावे अशी मागणी  नागडे येथील नागरिकांनी निवेदनात द्वारे केली.*

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने