पंतप्रधान नरेंद्रजी मोदी सरकारच्या नवीन कृषी विधेयकामुळे कृषी क्षेञातील दलाली मोडीत निघणार : शिरपूर भाजपा तालुकाध्यक्ष किशोर माळी




*शिरपूर भाजपा तालुकाध्यक्ष किशोर माळी यांनी केले कृषी  विधेयकाचे स्वागत*

*शिरपूर : केंद्र सरकारने लोकसभा व राज्यसभे मध्ये मंजूर केलेले तिन्ही विधेयक हे शेतकऱ्यांच्या हिताचे असून यामुळे शेतकऱ्यांना शेतमाल विक्रीची हमी, किमतींची हमी  व कृषी प्रक्रिया प्रकल्पात मोठ्या प्रमाणावर  गुंतवणुकीत वाढ होणार असुन पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी सरकारच्या नविन कृषी विधेयकामुळे कृषी क्षेञातील दलाली मोडीत निघणार असल्याचे मत भाजपा तालुकाध्यक्ष  किशोर माळी यांनी म्हटले असुन या विधेयकाचे स्वागत केले आहे.* *कृषी उत्पादन व्यापार आणि वाणिज्य ( प्रोत्साहन आणि सुविधा) विधेयकामुळे* बाजार समितीची कोणतेही बंधन शेतकऱ्यांना राहणार नाही. त्यामुळे शेतकरी आपला शेतमाल थेट शहरात, विविध मॉल व प्रक्रिया केंद्र यांना विकू शकतो. तसेच आंतरराज्यीय आणि राज्यांतर्गत व्यापाराला प्रोत्साहन मिळणार आहे. दुसरे विधेयक हे *शेतकरी (सक्षमीकरण आणि संरक्षण) किंमत हमी व कृषी सेवा करार विधेयक* असून यामुळे कृषी प्रक्रिया उद्योजक, निर्यातदार, मोठे खरेदीदार हे शेतकऱ्यांशी शेतमाल खरेदी चा करार करणार असून त्यामुळे  पीक लागवडीपूर्वी शेतकऱ्यांना भाव माहित होणार आहे. त्यामुळे अधिक उत्पादन यामुळे भाव पडण्याची भीती राहणार नाही. कंत्राटी शेती म्हणजे शेतमाल खरेदी बाबतचा करार असून यामध्ये कुठल्याही शेतकऱ्याची शेती कोणत्याही कंपनीला मिळणार नाही. याबाबत विरोधक शेतकऱ्यांमध्ये गैरसमज पसरवत आहेत. 
तिसरे विधायक हे *अत्यावश्यक वस्तू (सुधारणा) विधेयक* आहे. अत्यावश्यक वस्तू मधून कडधान्य, तूणधान्ये, तेलबिया, खाद्यतेल, कांदा व बटाटा वगळले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना  बाजारातील तेजीचा लाभ उठवता येईल. तसेच शेती क्षेत्रात थेट परकीय गुंतवणूक आल्यामुळे प्रक्रिया कारखाने उभारल्याने शेतमालाला अपेक्षित दर मिळणार आहे. म्हणून शिरपूर भाजपच्या वतीने पंतप्रधान नरेंद्रजी मोदी, केंद्रीय कृषिमंत्री ना. नरेंद्रसिंह तोमर तसेच सर्व मंत्री मंडळाचे व या नविन क्रांतीकारी कृषी विधेयकाला लोकसभेत सकारात्मक मतदान करणार्‍या नंदुरबार लोकसभा मतदार संघाच्या लोकप्रिय खासदार डाॅ. हिनाताई गावीत, धुळे लोकसभा मतदार संघाचे खासदार डाॅ. सुभाष भामरे यांचे शेतकर्‍यांच्या वतीने  अभिनंदन करतो व या तिन्ही कृषी विधेयकांचे स्वागत करीत असल्याचे शिरपूर भाजपा तालुकाध्यक्ष किशोर माळी यांनी म्हटले आहे.       

                   

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने