हलगर्जीपणा करणाऱ्यांवर कारवाई करावी : जिल्हाधिकारी संजय यादव

 



 

धुळे, दि. 21 (जिमाका वृत्तसेवा) : धुळे जिल्ह्यात कोरोना विषाणूच्या संसर्गाचा प्रादुर्भाव वाढत असताना या आजाराला प्रतिबंध करण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय रुग्णावरील उपचार करण्याची कार्यवाही क्षेत्रीयस्तरावरील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी करणे अभिप्रेत आहे. मात्र, काही अधिकारी नेमून दिलेली कामे करण्यास टाळाटाळ करीत असल्याने याबाबत स्थानिक लोकप्रतिनिधी वेळोवेळी तोंडी तक्रार करीत आहेत. त्यामुळे अशा अधिकाऱ्यांना कामाप्रती दक्ष राहण्याच्या सूचना द्याव्यात. त्यानंतरही कामात हलगर्जीपणा अनियमितता करीत असल्यास चौकशी करून संबंधितांवर आवश्यक ती कार्यवाही करावी. आवश्यक वाटल्यास गुन्हे दाखल करावेत, असे निर्देश जिल्हाधिकारी संजय यादव यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी, अधिष्ठाता, श्री भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सर्वोपचार रुग्णालय, एसीपीएम जवाहर मेडिकल कॉलेज,  आयुक्त, महानगरपालिका, जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी, नोडल अधिकारी आदींना दिले आहेत.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने