भरतसिंह राजपूत सेनेच्या उप जिल्हा प्रमुख पदावर



शिरपूर : शिरपूर येथील कट्टर शिव सेना समर्थक नेते व अनेक वर्षांपासून शिव सेनेची धुरा आपल्या खांद्यावर घेऊन तालुक्यात प्रखर  राजकीय विरोध असताना प्रवाहाच्या विरोधात टिकून राहून शिवसेनेच्या माध्यमातून राजकारण करत सामान्यांसाठी लढा दिला सत्ता नसतानाही कधी सत्तेच्या मागे न धावता शिवसेनेच्या सोबत अखंड अविरत साथ देऊन कट्टर शिवसैनिक म्हणून त्यांनी काम केले असे तालुक्यातील भरतसिंह राजपूत यांची शिवसेनेच्या जिल्हा उपप्रमुख पदावर नियुक्ती करण्यात आली. ते यापूर्वी तालुकाप्रमुख पदावर कार्यरत होते. श्री राजपूत यांनी यापूर्वी भारतीय विद्यार्थी सेनेचे तालुकाप्रमुख म्हणूनही काम पाहिले आहे. पक्षातील त्यांचे कार्य पाहून पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, संपर्कप्रमुख बबनराव थोरात, जिल्हाप्रमुख हेमंत साळुंखे यांनी त्यांची जिल्हा उपप्रमुख पदावर नियुक्ती केली. या पदाचा उपयोग करून शिरपूर  तालुक्यात शिवसेनेचा प्रभाव निर्माण करू, शिवसैनिकांची संख्या वाढवू असे भरतसिंह राजपूत यांनी सांगितले.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने