शहादा (प्रतिनिधी) :- शहादा तालुक्यातील पत्रकार कल्पेश राजपूत यांची नुकतीच सोशल मीडिया शहादा तालुका अध्यक्ष पदावर नियुक्ती जाहीर करण्यात आली आहे. कल्पेश राजपूत हे दैनिक पोलीस शोध वृत्त पत्राचे शहादा प्रतिनिधी म्हणून कार्यरीत आहेत. सदरची नियुक्ती संघटनेचे प्रदेशाध्यक्ष महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रोनिक सोशल मीडिया मा. अतुलसिंह परदेशी व करणी सेनेच्या महाराष्ट्र सोशल मीडिया उपाध्यक्ष महेंद्रसिंह पी. राजपूत यांनी जाहीर केली आहे.
संघटनेने पत्रकारिता क्षेत्रातून आजपर्यंत निस्वार्थ भावनेने केलेले काम समाजकार्य व निष्ठा पाहून करणी सेना संघटने सदरची निवड जाहीर केली आहे. या पदाचा वापर आपण समाज हितासाठी, सामन्याना न्याय मिळवून देण्यासाठी, समाज संघटनासाठी करावा अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. संघटनेसाठी कार्य करत असताना संघटनेचे मूलभूत तत्व, समाज संघटन आणि त्यातून राष्ट्रहित साध्य होईल आणि कोणत्याही प्रकारे संघटनेची बदनामी किंवा नुकसान होणार नाही याची काळजी घेऊन सामान्यांना न्याय मिळवून देण्यासाठी, अन्यायाविरुद्ध वाचा फोडून सत्याच्या लढा देण्यासाठी आपण ह्या पदाचा वापर कराल अशी अपेक्षा संघटनेच्या वरिष्ठांनी व्यक्त केली आहे.
सदरच्या नियुक्तीचे प्रदेशाध्यक्ष महाराष्ट्र राज्य सोशल मीडिया अतुलसिंह परदेशी, दिनेश राजपूत महाराष्ट्र राज्य करणी सेना प्रवक्ता व करणी सेनेच्या महाराष्ट्र सोशल मीडिया उपाध्यक्ष महेंद्रसिंह पी. राजपूत यांनी स्वागत केले असून धुळे जिल्ह्यातील करणी सेनेच्या विविध पदाधिकाऱ्यांनी या निवडीबद्दल आभार व्यक्त करून धन्यवाद दिले आहेत. तसेच समाज बांधव, पत्रकार बांधव व मित्र परिवारांनी या निवडीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
Tags
news
