भारतीय कम्युनिस्ट पक्षातर्फे आज शिरपूर आज निषेध दिन




शिरपूर प्रतिनिधी भारतीय कम्युनिस्ट पक्षातर्फे आज शिरपूर शहरात निषेध दिन पाळला गेला आहे .आज दिनांक 14 सप्टेंबर रोजी शिरपूर शहरात मा. उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांना निवेदन सादर करून भारतीय कम्युनिस्ट पक्षाने निषेध दिन पाळला आहे .
भारतीय कम्युनिस्ट पक्षातर्फे आणि आयटक कामगार संघटनांच्या वतीने आज देशभरात देशव्यापी निषेध दिन पाळला जात आहे यानिमित्ताने दिलेल्या निवेदनात कम्युनिस्ट पक्षाने खालील मागण्या नमूद केल्या आहेत यात प्रामुख्याने शेतकरी विरोधी अध्यादेशातील पक्षांतर्फे होळी करण्यात आली म्हणून अध्यादेश रद्द करण्यात यावे,  मोदी सरकारने घेतलेले सार्वजनिक क्षेत्राबाबत खाजगीकरणाचे धोरण रद्द करण्यात यावे, संसर्ग काळात कोरोना रुग्णाचा सर्व खर्च  सरकारने करावा, कोरोना काळात शिक्षणाची फी माफ करावी, गरजूंना मोफत रेशन 10 किलो गहू 10 किलो तांदूळ प्रत्येक नागरिकाला मिळावे, पेट्रोल-डिझेलची दरवाढ कमी करण्यात यावी ,पाटबंधारे विभागाकडून पाणीपट्टी बाबतचे खाजगीकरण धोरण रद्द करण्यात यावे आणि कोरोना काळातील संपूर्ण वीजबिल माफ करण्यात यावे अशा मागण्यांचे निवेदन दिले असून केंद्र व राज्य सरकारच्या जाहीर निषेध व्यक्त केला आहे .
सदरच्या निवेदनावर हिरालाल परदेशी जिल्हा सेक्रेटरी, अडवोकेट मदन परदेशी सल्लागार, एडवोकेट संतोष पाटील सेक्रेटरी शिरपूर तालुका ,एडवोकेट रोशन परदेशी इत्यादींनी सह्या केल्या आहेत


Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने