शिरपूर प्रतिनिधी - अनंत चतुर्थीच्या दिवशी जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यातील विरवडे गावातील राजपूत समाजातील तीन युवक दुर्दैवी घटनेत नदीवरील पाण्यात बुडून मृत पावल्याची घटना घडली होती या घटनेने पीडित कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असताना समस्त राजपूत समाज यांच्याकडून हळहळ व्यक्त होत असताना समाज बांधवांकडून या मुलांचे फोटो श्रद्धांजली साठी सोशल मीडियातून टाकण्यात आले होते.
मात्र या पोस्टवर फेसबुक ला राज कमल पाटील व अर्जुन नरवाडे या दोन इसमांनी या तरुण बाबत आक्षेपार्ह विधान केले. याचा जाब विचारण्यासाठी समाजबांधवांनी यांना फोन केला असता त्यांनी अरेरावीची भाषा करून हिंदू देवी-देवतांच्या देखील अपमान करून विटंबना केली आहे. त्यामुळे समस्त राजपूत समाजाचे व हिंदू समाजाच्या भावना दुखावल्या आहेत.
सदर विकृत मानसिकतेचे लोकांवर तात्काळ गुन्हा दाखल करून कायदेशीर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी आज शिरपूर तालुक्यातील राजपूत समाज बांधव, करणी सेना महाराष्ट्र राज्य, श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना व शिवछत्रपती प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य यांच्यावतीने उपविभागीय पोलिस अधिकारी शिरपूर, पोलीस निरीक्षक शहर पोलीस स्टेशन शिरपूर यांना निवेदन देण्यात आले आहे. तसेच तालुक्यातील युवकांनी याबाबत थाळनेर व सांगवी पोलीस देखील निवेदन सादर केले आहे.
यावेळी श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना चे भरत सिंह राजपूत, भूपेश परदेशी, राज सिसोदीया, मुन्ना राजपूत, रोहित राजपूत, वैभव राजपूत, जितेंद्र राजपूत ,तुषार राजपूत भूषण राजपूत यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.
करणी सेना महाराष्ट्र राज्य यांनी देखील आपले निवेदन दिले असून शिवाजी राजपूत ,महेंद्र राजपूत, भावेश राजपूत, तेजस राजपूत ,राजपाल राजपूत गणेश राजपूत जितेंद्र राजपूत संदीप राजपूत ,वीरपाल राजपूत ,रोहित राजपूत ,यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते तसेच शिवछत्रपती प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य यांनी देखील निवेदन दिले असून या संघटनेचे चेतन राजपूत ,अमोल राजपूत, कृष्णा पाटील ,योगा पाटील, मनीष पाटील, प्रमोद पाटील, प्रशांत राजपूत इत्यादी युवकांनी या निवेदनांवर सह्या केल्या असून या तीनही संघटनांच्या मार्फत संघटनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी हे निवेदन सादर केले आहे.
Tags
news


